श्रीलंकेत संपूर्ण सोशल मीडियाही केला बंद; 36 तासांचा कर्फ्यू लागू

श्रीलंकेत संपूर्ण सोशल मीडियाही केला बंद; 36 तासांचा कर्फ्यू लागू
Updated on

कोलंबो: अभूतपूर्व अशा आर्थिक कोंडीत अडकलेल्या श्रीलंकन सरकारने आता संपूर्ण देशातील सोशल मीडियावर बंदी घातली आहे. काल रविवारी रात्रीपासून सर्व प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या जवळपास दोन डझन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये (social media blackout in Sri Lanka)प्रमुख प्लॅटफॉर्म्स फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, युट्यूब, स्नॅपचॅट, टिक-टॉक आणि इन्स्टाग्राम यांचा समावेश आहे. (Sri Lanka Crisis)

श्रीलंकेत संपूर्ण सोशल मीडियाही केला बंद; 36 तासांचा कर्फ्यू लागू
वाढता वाढता वाढे! पेट्रोल-डिझेलच्या दरांनी आजही कापला खिसा

इंटरनेटबाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या नेटब्लॉक्सने ट्विट करत माहिती दिली आहे की, रिअल-टाइम नेटवर्क डेटा दर्शवितो की श्रीलंकेने देशभरात सोशल मीडिया ब्लॅकआउट लागू केला आहे. देशभरात सरकारविरोधात सुरु असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी लागू केल्यामुळे ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि इंस्टाग्रामसह अनेक प्लॅटफॉर्म्सवर बंदी लागू करण्यात आली आहे.

काल रविवारीच सरकारने 36 तासांचा कर्फ्यू लागू केला आहे. देशभरात सगळीकडेच वीजेची टंचाई निर्माण झाली असून महागाई गगनाला भिडली आहे. देशात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव जवळपास तीन पटीने वाढले असून सगळीकडेच रांगा लागल्या आहेत.

श्रीलंकेत संपूर्ण सोशल मीडियाही केला बंद; 36 तासांचा कर्फ्यू लागू
आरटीपीसीआर म्हणजे काय?

जवळपास 22 दशलक्ष लोकसंख्या असलेलं आणि बेटावर वसलेल्या श्रीलंकेवर अशी परिस्थिती पहिल्यांदा आली आहे. मात्र, वाढत्या जनक्षोभाचा सामना करणं सरकारला अवघड जात असून इंधन आयात करण्यासाठीही परकीय चलन उपलब्ध नसल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील ही अराजकता शांत करणं सरकारसमोरील आव्हान बनत चाललं आहे.

गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत तातडीने सार्वजनिक आणीबाणी घोषित करणारं राजपत्र जारी केलंय. राजपक्षे यावेळी म्हणाले की, सार्वजनिक सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्थेचे संरक्षण आणि समुदायाच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा आणि सेवांची देखभाल या हितासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.