राजपक्षे समर्थकाची कचऱ्याच्या गाडीतून काढली धिंड, श्रीलंकेत आंदोलन चिघळलं

Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisis esakal
Updated on
Summary

देशात राजपक्षेंसोबतच आता त्यांच्या समर्थकांनाही लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय.

Sri Lanka Crisis : भारताचा शेजारील देश श्रीलंकेमधील (Sri Lanka) आर्थिक संकट आणखी बिकट होत चाललंय. यामुळं श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. आर्थिक संकटामुळं पंतप्रधान महिंदा राजपक्षे (PM Mahinda Rajapaksa) यांनी राजीनााम दिला. मात्र, त्यानंतर देशात हिंसाचार उसळलाय. महागाईनं त्रस्त जनता रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. इतकंच नाही तर आंदोलकांनी तोडफोड करत हिसांचार सुरु केलाय. आता आंदोलकांनी राजपक्षे यांच्या घराला आग लावली असून राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) यांचंही घर जाळलंय.

दरम्यान, देशात राजपक्षेंसोबतच आता त्यांच्या समर्थकांनाही लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. यासोबतच राजपक्षे यांच्या समर्थकांवरही हल्ले करण्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो व्हिडिओ श्रीलंकेचा असल्याचं बोललं जातंय. या व्हिडिओत काही लोकांचा जमाव एका व्यक्तीला चक्क कचऱ्याच्या गाडीत टाकून धिंड काढत आहे. कचऱ्याच्या गाडीतील व्यक्ती ही राजपक्षे यांचा समर्थक असल्याचं बोललं जातंय.

Sri Lanka Crisis
भोंग्यांबाबत न्यायालयीन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा : CM बोम्मई

सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यासोबत मोदी सरकारच्या समर्थकांना देखील इशारा देण्यात येत आहे. श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इथं खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा आहे. शिवाय, पेपरफुटीमुळं शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलाव्या लागल्या आहेत. त्यामुळं श्रीलंकेत सध्या बिकट परिस्थिती निर्माण झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.