कोलंबो : श्रीलंकेत सध्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक अरिष्ट निर्माण झालं असून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. प्रामुख्यानं इंधनचा तुटवडा निर्माण झाल्यानं त्याच्या दरातही मोठी वाढ झाल्यानं महागाईतही वाढ झाली आहे. दरम्यान, इंधन मिळतच नसल्यानं आता सायकलींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. (Sri Lanka Economic Crisis Bicycle demand in Sri Lanka hikes amid fuel shortage)
श्रीलंकेतील या परिस्थितीबाबत सांगताना एका नागरिकानं सांगितलं की, आम्हाला सध्या पेट्रोल परवडत नाहीए. ते ही मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. पण रांगेत थांबूनही पेट्रोल मिळेल याची श्वाश्वती नाही. त्यामुळं आता लोकांनी सायकलींचा आणि सार्वजनिक वाहनांचा पर्याय निवडला आहे.
श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळं आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून इथल्या जनतेनं अनेक वर्ष सत्ता उपभोगलेल्या राजेपक्षे कुटुंबाच्या सरकारवर आणि धोरणांवर टीका करुन त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला भाग पाडलं आहे. यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलक नागरिकांनी राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानात घुसून मोडतोड केली असून पंतप्रधानांचे घरही पेटवून दिले होते.
नागरिकांच्या रोषापुढे अखेर झुकत श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमसिंगे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता राष्ट्रपती गोटाबाया राजेपक्षे हे देखील येत्या दोन दिवसात राजीनामा देणार आहेत, असं त्यांनी अधिकृत पत्र पंतप्रधानांकडे सोपवलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.