…तर कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होतील; श्रीलंकेतील डॉक्टरांचा इशारा

Food Crisis In Sri Lanka
Food Crisis In Sri Lanka esakal
Updated on

श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे, हे संकट इतके भीषण आहे की यामुळे कोरोना साथीपेक्षा कितीतरी जास्त मृत्यू होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या आर्थीक संकटामुळे जीवनआवश्यक औषधे जवळजवळ संपली असल्याने डॉक्टरांनी हा इशारा दिला आहे. सध्या श्रीलंकेत वीज तुटवडा तसेच अन्न, इंधन आणि औषधांच्या तीव्र टंचाईशी नागरिक झुंजत आहेत.

एएफपी एजन्सीने दिलेल्या रिपोर्टनुसार, श्रीलंका मेडिकल असोसिएशन (एसएलएमए) ने सांगितले की देशातील सर्व रुग्णालयांना यापुढे आयात केलेली वैद्यकीय साधने आणि महत्वाची औषधे उपलब्ध नाहीत. तसेच अनेक रुग्णालयांमध्ये मागील महिन्यापासून नियमित केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया स्थगित केल्या आहेत. भूल देण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु SLMA ने सांगितले की आपत्कालीन शस्त्रक्रीया करणे देखील लवकरच शक्य होणार नाहीत.

"आम्हाला खूप कठीण निर्णय घ्यायचे आहेत. कोणावर उपचार करायचे आणि कोणाला नाही हे आम्हाला ठरवायचे आहे," राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना परिस्थितीबद्दल चेतावणी देण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्र पाठवणाऱ्या एका गटाने एफपीला ही माहिती दिली. “जर काही दिवसांत पुरवठा पूर्ववत केला गेला नाही तर, साथीच्या रोगापेक्षा मृत्यूची संख्या खूपच वाईट असेल,” असे त्यात म्हटले आहे.

Food Crisis In Sri Lanka
Google ने प्ले स्टोअरवरून काढले हे 6 धोकादायक ॲप्स; लगेच करा डिलीट

राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत या संकटावर जनतेचा संताप वाढला आहे. राजधानी कोलंबोमधील नेत्याच्या सीफ्रंट ऑफिसबाहेर दुसऱ्या दिवशीही निदर्शने करण्यासाठी हजारो लोक मुसळधार पावसात देखील जमले होते. दरम्यान, राजपक्षे यांनी 42 अपक्ष खासदारांचा समावेश असलेल्या 11-पक्षीय युतीच्या मित्रपक्षांना देशातील आर्थिक संकटावर चर्चेचे निमंत्रण दिले आहे, असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने महिंदा व्यतिरिक्त राजीनामा दिला होता जेव्हा देश 1948 मध्ये यूकेपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

Food Crisis In Sri Lanka
PM मोदी अन् US राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात उद्या व्हर्चुअल बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()