श्रीलंकन राष्ट्रपती तिथल्या पंतप्रधानांना पदावरून हटवणार

श्रीलंकेतील नागरिक राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्यासाठी देशभर पुरकारलेल्या संपात सहभागी
Gotabaya Rajapaksa And Mahinda Rajapaksa
Gotabaya Rajapaksa And Mahinda Rajapaksa esakal
Updated on

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa ) हे पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांना पदावरुन काढण्यास शुक्रवारी राजी झाल्याचे लोकप्रतिनिधी मैथ्रीपाल सिरिसेना यांनी राष्ट्रपतींबरोबर बैठक झाल्यानंतर सांगितले. पंतप्रधान हे गोताबया यांचे भाऊ आहेत. राष्ट्रपतींनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. यात सर्वपक्षीय सरकार बनवण्यावर चर्चा झाली अनेक सदस्यांनी पंतप्रधानांची उपस्थिती असल्याने बैठकीला उपस्थित नव्हते. राष्ट्रीय परिषदेची नवीन पंतप्रधानांच्या निवडीसाठी स्थापन केली जाईल. मंत्रिमंडळात संसदेतील सर्व पक्षांचा समावेश असेल, याबाबत राष्ट्रपती राजपक्षे हे राजी असल्याचे सिरिसेना यांनी सांगितले. (Sri Lankan President Agreed To Remove Mahinda Rajapaksa As Prime Minister)

Gotabaya Rajapaksa And Mahinda Rajapaksa
गोळीबाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्त; श्रीलंका मानवाधिकार आयोग

राजपक्षे यांच्या अगोदर सिरिसेना हे राष्ट्रपती होते. श्रीलंकेतील (Sri Lanka) नागरिकांनी राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्यासाठी गुरुवारी (ता.२८) देशभर पुरकारलेल्या संपात सहभागी झाले होते. राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली देश सर्वात भयावह आर्थिक संकटातून जात आहे. निदर्शने या महिन्यापूर्वी सरकारविरोधात आणखीन तीव्र करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामगारही संपात सहभागी झाले. यामुळे भारनियमन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.

Gotabaya Rajapaksa And Mahinda Rajapaksa
काँग्रेसला 'पीके'ची गरज नाही, पक्षात अनेक दिग्गज नेते आहेत - प्रशांत किशोर

तामिळनाडूने शुक्रवारी राज्य विधिमंडळात एक प्रस्ताव पारित केला. यात केंद्र सरकारला संकटात सापडलेल्या श्रीलंकेला मदत पाठवण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या मदतीत अत्यावश्यक वस्तू जसे की तांदूळ, डाळी, दुग्धत्पादन आणि औषधे आदींचा समावेश आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.