श्रीलंकेत औषधांचा तुटवडा, पेट्रोलपेक्षाही दूध महाग; नागरिकांवर उपाशी झोपण्याची वेळ

एक कप चहासाठी नारिकांना 100 रुपये मोजावे लागत असून, मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे.
Food Crisis In Sri Lanka
Food Crisis In Sri Lanka esakal
Updated on

कोलंबो : भारताचा शेजारी राष्ट्र श्रीलंकेत (Sri lanka) महागाईमुळे (Inflation) हाहाकार माजला आहे. त्यात येथील रुग्णालयातील औषधे (Medicine) संपल्याने डॉक्टरांनी रुग्णांचे शस्त्रक्रिया करणे थांबवल्या आहेत. पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले असून, अनेक लोकांना उपाशी झोपावे लागत आहे. (Sri lanka Facing Power Cut Issue & Shortage Of Medicine)

Food Crisis In Sri Lanka
रतन टाटा यांना भारतरत्न द्या; हायकोर्टाने दिला याचिका दाखल करण्यास नकार

एका कप चहासाठी (Tea) नारिकांना येथे 100 रुपये मोजावे लागत असून, मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. एक किलो (Vegetables) बटाट्यासाठी 200 रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाच्या कमतरतेचा वीजनिर्मितीवरही (Electricity) परिणाम झाला असून, अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा (Power Cut) खंडित केला जात आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे.

Food Crisis In Sri Lanka
IPL दरम्यान पॉर्न स्टार चर्चेत; आधीही घडलं होतं असंच काही!

गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी, श्रीलंका सरकारने चलन मूल्यात तीव्र घसरण आणि त्यानंतर अन्नधान्याच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी घोषित केली होती. एवढेच नाही तर एक लिटर पेट्रोलसाठी नागरिकांना 254 रुपये मोजावे लागत आहेत. तर एक लिटर दूध 263 रुपयांना विकले जात असून, एक ब्रेडचे पॅकेट 150 रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. येथे एक किलो तांदूळ आणि साखरेचा भाव 290 रुपये किलोवर पोहोचला आहे.

पाच लाखांहून अधिक लोक गरिबीच्या गर्तेत

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशातील 500,000 लोक गरिबीच्या गर्तेत अडकल्याचा अंदाज जागतिक बँकेने गेल्या वर्षी व्यक्त केला होता. अहवालानुसार, ज्या कुटुंबांना पूर्वी श्रीमंत मानले जात होते, त्यांना दोनवेळेच्या जेवणाची सोय करणे कठीण जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.