Staple Visa : भारतीय खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेला 'स्टेपल्ड व्हिसा' म्हणजे काय? यात भारत चीन संबंध पुन्हा एकदा चिघळले

भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा जुंपली
Staple Visa
Staple Visa esakal
Updated on

Staple Visa : भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. यामागचं कारण आहे भारतीय खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेला 'स्टेपल्ड व्हिसा'. खरं तर 28 जुलैपासून वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स सुरू होणार आहेत. यात चीनने तीन भारतीय खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा दिला आहे. यावर भारताने मात्र तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारत सरकारने तिन्ही खेळाडूंना विमानतळावरून परत बोलावलं आहे.

चीनने उचललेलं पाऊल आम्हाला मान्य नसल्याचं भारताने स्पष्टपणे सांगितलं आहे. वास्तविक, भारताचा 11 सदस्यीय वुशू संघ वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी चीनला जाणार होता. यातील तीन खेळाडू अरुणाचल प्रदेशातील होते. त्याला चीनमध्ये स्टेपल्ड व्हिसा देण्यात आला होता. चीनचा स्टेपल्ड व्हिसा भारतात मंजूर नाही.पण स्टेपल व्हिसा म्हणजे काय, चीन तो कधी आणि का जारी करतो आणि भारताने त्यावर आक्षेप घेतला आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Staple Visa
Travel Bus: खासगी बस चालकांकडून सामान्यांच्या खिशाला कात्री; सुट्यांचा परिणाम २० ते २५ टक्के भाडे वाढ

स्टेपल व्हिसा म्हणजे काय?

साधारणपणे, एखाद्या देशात प्रवास करण्यासाठी तुम्हाला त्या देशाची परवानगी घ्यावी लागते. ज्याला साधारण भाषेत व्हिसा म्हटलं जातं. प्रवासाच्या उद्देशानुसार व्हिसा बदलतात. जसं की बिझनेस व्हिसा, पार्टनर व्हिसा, ऑन अरायव्हल व्हिसा. यासंबंधीचे नियमही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे आहेत.

Staple Visa
Balaji Travels: पंक्चरवाला झाला सात लक्झरी कारचा मालक; आता स्वप्न हेलिकॉप्टरचे, वेड लावेल अशी सक्सेस स्टोरी

चीनमध्येही असाच व्हिसा दिला जातो. स्टेपल्ड व्हिसा म्हणजे इमिग्रेशन अधिकारी प्रवाशाच्या पासपोर्टवर कोणताही शिक्का मारत नाही. पासपोर्टमध्ये स्लिप म्हणून ते स्टेपल केले जाते. या स्लिपमध्ये प्रवासी चीनला का जात आहेत, त्याचा उद्देश काय आहे हे स्पष्ट लिहिलेलं असतं. म्हणूनच याला स्टेपल्ड व्हिसा म्हणतात. पासपोर्टला वेगळी स्लिप जोडण्यासाठी स्टेपलरचा वापर केला जातो, म्हणून त्याला स्टेपल्ड व्हिसा असं नाव देण्यात आलं आहे.

Staple Visa
Traveling Tips : फिरायला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'या' पर्यटनस्थळांवर पाऊस कमी होईपर्यंत असणार आहे बंदी!

चीन व्यतिरिक्त, क्यूबा, इराण आणि उत्तर कोरियासह अनेक देश आहेत जे स्टेपल्ड व्हिसा जारी करतात. याआधी हे देश चीन आणि व्हिएतनामलाही असाच व्हिसा देत असत, मात्र करारानंतर तो शिथिल करण्यात आला आहे. मात्र चीनमध्ये भारतीय खेळाडूंना हा व्हिसा देऊन दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा चिघळले आहेत.

Staple Visa
Travels Journey : अनफिट खासगी ट्रॅव्हल्सचा रत्नागीरी ते मुंबई प्रवास

व्हिसामुळे भारत-चीन संबंध का बिघडले?

याचं कारण चीनची मानसिकता आहे. वास्तविक, तिबेटवर आपला अधिकार आहे आणि भारताचा अरुणाचल प्रदेश तिबेटचा भाग असल्याचं चीनचं म्हणणं आहे. त्यांना असं वाटतं की अरुणाचल प्रदेशावरही त्यांचा अधिकार आहे आणि तेथील लोकांना त्यांच्या देशात येण्यासाठी व्हिसाची गरज नाही. हा वादाचा मुद्दा आहे.

Staple Visa
Fridge Care Tips : पावसाळ्यात या चुका कराल तर फ्रिजला बुरशी चढेल, अन्नपदार्थही होतील खराब!

त्यामुळेच त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंसाठी स्टेपल व्हिसा जारी केला आहे. भारताने यापूर्वीही या विषयावर आक्षेप घेतला होता. 2014 मध्ये भारतात आलेले तत्कालीन चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, चीनकडून स्टेपल्ड व्हिसा देणं म्हणजे आम्ही सीमा मुद्द्यांवर कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही असा याचा अर्थ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.