छत्रपती शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला; पुण्याशी होतं कनेक्शन

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in North America San Jose
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in North America San Jose
Updated on

उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून चोरीला गेला आहे. सॅन होजे येथील पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सव्‍‌र्हिसेस विभागाने शुक्रवारी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे.

शहरातील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधून या उद्यानातून हा पुतळा कधी चोरी झाला याबद्दल माहिती मिळू शकली नाही, असे स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनी केटीव्हीयूने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळ्याचे पुण्याशी कनेक्शन होते. उत्तर अमेरिकेतील सॅन होजे हा शहराला हा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in North America San Jose
Turkey Syria Earthquake : तुर्कीला आतापर्यंत बसलेत 435 झटके! मृतांची संख्या 8 हजारांच्या पुढे

या पुतळ्याच्या चोरीमुळे शहरवासीयांना खूप दुःख झाले आहे, असे विभागाने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुतळ्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न काम करत आहोत आणि लवकरच याबद्दल अपडेट देऊ. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि या कामात नागरिकांची मदत घेतली जात असल्यचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in North America San Jose
Kasba Peth By-Election : 'आता नंबर बापटांचा का…?'; कसब्यात भाजपच्या उमेदवारीवरून झळकले पोस्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.