'सलाम तालिबान' म्हणत पाकिस्तानात उदो उदो; विजयाबद्दल खास कार्यक्रम

'सलाम तालिबान' म्हणत पाकिस्तानात उदो उदो; विजयाबद्दल खास कार्यक्रम
Updated on

इस्लामाबाद : अफगाणिस्तानच्या बिकट स्थितीने जग हादरले आहे. हजारो नागरिक तालिबानच्या अत्याचारी कारवायांच्या भितीपोटी देश सोडून जात आहेत. तालिबान संपूर्ण देशाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे मात्र त्याचा उदो उदो केला जात आहे. एका मदरशाच्या गच्चीवर तालिबानचा झेंडा फडकविण्यात आला असून अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थापन झाल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

'सलाम तालिबान' म्हणत पाकिस्तानात उदो उदो; विजयाबद्दल खास कार्यक्रम
३१ ऑगस्टनंतर थांबलात तर याद राखा; तालिबान्यांचा अमेरिकेला इशारा
'सलाम तालिबान' म्हणत पाकिस्तानात उदो उदो; विजयाबद्दल खास कार्यक्रम
Afghanistan Crisis : संघर्षांच्या चक्रव्यूहात अफगाणिस्तान

एवढेच नाही तर मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सलाम तालिबान’ नावाचे गीतही गायले. त्यांनी दहशतवादी संघटनांचे कौतुक केले असून या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानचे पत्रकार रुहान अहमद यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत बुरखा घातलेल्या मुली तालिबानच्या झेंड्याबरोबर ‘सलाम तालिबान’ हे गीत म्हणताना दिसतात. पत्रकार अहमद यांनी म्हटले की, इस्लामाबादच्या लाल मशिदशी संबंधित असलेला मदरसा जामिया हफ्साच्या विद्यार्थिनी या तालिबानची सत्ता आल्याने आनंद व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गाणे म्हणताना दिसतात. अफगाणिस्तानचे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते हबीब खान यांनी म्हटले की, पाकिस्तानी नागरिकांना अफगाणिस्तानवरील आक्रमणाचा आनंद व्यक्त करू द्या. शेवटी अफगाणी आपल्या जमिनीला स्वातंत्र्य मिळवून देतील आणि हल्लेखोरांना पिटाळून लावतील. लक्षात ठेवा पाकिस्तानचे तुकडे होतील.

'सलाम तालिबान' म्हणत पाकिस्तानात उदो उदो; विजयाबद्दल खास कार्यक्रम
अफगाण निर्वासितांना प्रवेश द्या

कुमार विश्‍वास यांची टीका

कुमार विश्‍वास यांनी या व्हिडिओबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. ज्या देशात सैनिकी शाळेचे लहान मुले तालिबान्यांच्या गोळ्याचे शिकार ठरले होते, त्याच देशातील मदरशात मुलांकडून मारेकऱ्यांचे उदात्तीकरण करून घेतले जात आहे. संपूर्ण जगात फिरून आणि ऑक्सफर्डमध्ये शिकूनही जंगलराज तयार केले जात आहे. इम्रान खान यांच्यासारख्या व्यक्ती मानवतेला कलंक आहेत, अशा शब्दात कुमार विश्‍वास यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.