वॉशिंग्टन : जगातील सर्वात वाईट दुर्घटना म्हणजे टायटॅनिक जहाजाला मिळालेली जलसमाधी. या घटनेवर टायटॅनिक या नावानंच काही वर्षांपूर्वी हॉलिवूडमध्ये सिनेमा येऊन गेला ज्यानं ऑस्कर पुरस्कारावर मोहोरही उमटवली. तेव्हापासून या महाकाय टायटॅनिक जहाजाबाबत जगभरातील लोकांमध्ये मोठं कुतुहल आहे.
याच कुतुहलापोटी दोन अब्जाधिश या जहाजाचे अवशेष पाहाण्यासाठी पाणबुडीनं अटलांटिक महासागराच्या तळाशी गेले पण ते पाणबुडीसह बेपत्ता झाले आहेत.
विशेष म्हणजे काही तासाचाच ऑक्सिजन या पाणबुडीमध्ये शिल्लक आहे, त्यामुळं या पाणबुडीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. (Submarine with five touritst including two billionaires disappeared due to expedition to look debris of Titanic)
पर्यटन कंपनी ओशियनगेटच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधिश लोक टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहाण्यासाठी रविवारी मध्य अटलांटिक महासागराच्या तळाशी जायला निघाले. पण काही तासांनंतर या पाणबुडीचा संपर्क तुटला असून तिचा तळाशी अपघात झाला की काही तांत्रिक बिघाड झालाये हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या पाणबुडीसह त्यात असलेल्या पाच जणांच्या बचावाची मोहिम सुरु करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या कोस्टगार्डच्या माहितीनुसार, पाणबुडीनं महासागराच्या ताळाशी जायला निघाल्यानंतर १ तास ४५ मिनिटांत या पाणबुडीचा संपर्क तुटला. जिथं टायटॅनिक हे जगप्रसिद्ध जहाज बुडालं त्या ठिकाणी त्याचे अवशेष पर्यटकांना दाखवण्यासाठी महासागरात तब्बल ३८०० मीटर खोल ही पाणबुडी जाते. आठ दिवसांच्या या पर्यटन यात्रेचं तिकीट अडीच लाख अमेरिकन डॉलर अर्थात दोन कोटी रुपये इतकं असतं. (Latest Marathi News)
बेपत्ता झालेल्या पाणबुडीचा शोध अमेरिकेच्या सरकारी एजन्सी, अमेरिका आणि कॅनडाची नौदलं आणि व्यावसायिक कारणासाठी समुद्रात खोलवर जाणाऱ्या कंपन्यांकडून घेतला जात आहे. अमेरिकेच्या बोस्टन भागात या पाणबुडीचा शोध घेतला जात आहे.
बेपत्ता झालेली पाणबुडी ओशियन गेट कंपनीची असून ती टायटन सबमर्सिबल आहे जो एका ट्रक एवढ्या आकाराची आहे. यामध्ये पाच लोक बसू शकतात. सर्वसामान्यपणे या पाणबुडीत बिकट परिस्थितीत चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजन ठेवलेला असतो.
अमेरिकेच्या कोस्टगार्डचे रिअर अॅडमिरल जॉन मॉगर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, बेपत्ता झालेल्या पाणबुडीला शोधण्यासाठी आमच्याकडं ७० ते ९६ तासांचा अवधी आहे. या पाणबुडीच्या शोधासाठी दोन विमानं आणि एक पाणबुडी तसेच सोनारनं सज्ज असलेले बांध पेरण्यात आले आहेत. ज्या भागात ही शोध मोहिम सुरु आहे ती खूपच दूर असल्यानं या मोहिमेत अडथळे येत आहेत. (Marathi Tajya Batmya)
बेपत्ता झालेल्या पाणबुडीत ब्रिटनचे अब्जाधीश उद्योगपती हामिश हार्डिंग (वय ५८) यांच्यासह पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा सुलेमान (वय १९) हे देखील आहेत.
या तीन पर्यटकांशिवाय एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट असे एकूण पाच लोक आहेत. यांच्या पाणबुडीनं न्यूफाऊंडलँडच्या सेंट जॉन्स इथून पाण्यात डुबकी लावली. त्यानंतर टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचून पुन्हा परत समुद्राबाहेर येण्साठी आठ तासांचा कालावधी लागतो.
ओशियनगेट कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, कंपनीजवळ तीन पाणबुड्या आहेत यांपैकी सिर्फट टायटन हीच पाणबुडी टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांपर्यंत पोहोण्यास सक्षम आहे. ही पाणबुडी १०४३२ किलो वजनाची असून ती १३१०० फूट खोल समुद्रात जाऊ शकते. या पाणबुडीत पाच प्रवाशांसाठी ९६ तासांचा जीवरक्षक ऑक्सिजन असतो.
ओशियनगेटच्या माहितीनुसार, पोलर प्रिन्स नामक जहाज या पाणबुडीच्या डुबकीच्या मोहिमेत काम करत असते. हे जहाज पाणबुडीला लोकेशनपर्यंत पोहोचवतं. पाणबुडीतील लोकांना बाहेरच्या जगाशी कुठलाही संपर्क साधता येत नाही.
कारण पाण्याच्या इतक्या खोलीवर कुठलंही जीपीएस चालत नाही की कोणता रेडिओ देखील चालत नाही. जेव्हा हे सपोर्ट जहाज पाणबुडीच्या बरोबर वर असतं तेव्हा ते टेक्स्ट मेसेजद्वारे सूचना देऊ शकतं किंवा स्विकारु शकतं. पण हे संदेशवहन या पाणबुडीबाबत सध्या होऊ शकत नाहीए.
या पाणबुडीत पर्यटक बसल्यानंतर तिला बाहेरुन बोल्ड लावून सील केलं जातं. ही पाणबुडी पाण्याच्यावर जरी आली तरी आतील पर्यटकांना बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नसतो. या पाणबुडीला कंपनीचे कर्मचारी केवळ बाहेरुनच खोलू शकतात.
टायटॅनिक जे आपल्या काळातील एक अवाढव्य असं क्रूझशिप होतं. आपल्या पहिल्याचं प्रवासादरम्यान या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. सन १९१२ मध्ये हे जहाज ब्रिटनहून अमेरिकेकडं निघालं होतं. अटलांटिक महासागरात ते एका आईसबर्गला धडकलं त्यामुळं त्याचे दोन तुकडे होऊन ते बुडालं होतं.
या जहाजावर त्यावळी २२०० लोक होते यांपैकी जवळपास १५०० लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सन १९८५ मध्ये या बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यात यश आलं होतं. तेव्हापासून हे अवशेष पाहण्यासाठी संशोधन मोहिमा सुरु झाल्या आहेत. या जहाजाचे अवशेष दोन तुकड्यांत विखुरले असून त्यांच्यामधील अंतर २६०० फूट इतकं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.