Sudan Crisis : सुदानमध्ये संघर्षामुळे चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू; गोळीबार सुरुच

सुदानमधील अंतर्गत संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून शस्त्रसंधीचा काळ असतानाही राजधानी खार्तुम आणि इतर काही शहरांमध्ये गोळीबार आणि तोफांचे आवाज घुमत होते.
Sudan Family
Sudan Familysakal
Updated on
Summary

सुदानमधील अंतर्गत संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून शस्त्रसंधीचा काळ असतानाही राजधानी खार्तुम आणि इतर काही शहरांमध्ये गोळीबार आणि तोफांचे आवाज घुमत होते.

खार्तुम - सुदानमधील अंतर्गत संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून शस्त्रसंधीचा काळ असतानाही राजधानी खार्तुम आणि इतर काही शहरांमध्ये गोळीबार आणि तोफांचे आवाज घुमत होते. लष्कर आणि निमलष्करात सुरु असलेल्या या संघर्षात आतापर्यंत किमान ४११ जणांचा मृत्यू झाला असून दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

सुदानमधील पश्‍चिम दार्फुर या प्रांताची राजधानी असलेल्या जेनेना या शहरात मोठा संघर्ष सुरु आहे. मागील आठवड्यात येथे गोळीबारात ८९ नागरिकांना प्राण गमवावा लागला. संघर्ष करत असलेल्या दोन्ही दलांचे सैनिक दाट लोकवस्ती असलेल्या भागांचा आश्रय घेत असल्याने जीवितहानीचे प्रमाण वाढले आहे. सुमारे पन्नास लाख लोकसंख्या असलेले खार्तुम हे शहर लष्कराचे प्रमुख जनरल अब्देल फताह बुऱ्हाण आणि रॅपिड सपोर्ट फोर्सचे प्रमुख जनरल महंमद हमादान दागालो यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू बनले आहे. यामुळे या शहरातील लाखो लोक जीव मुठीत घेऊन स्थलांतर करत आहेत. सुदानची लष्करशाहीकडून लोकशाहीकडे वाटचाल होण्याची जगाला अपेक्षा असतानाच ही यादवी सुरु झाल्याने येथील लोकशाहीचे भवितव्य अंधारात असल्याचे मत विश्‍लेषकांनी व्यक्त केले आहे.

बचाव मोहिमा सुरुच

सुदानमध्ये संघर्ष सुरुच असल्याने येथे अडकून पडलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी विविध देशांनी सुरु केलेल्या बचाव मोहिमा वेगात सुरु आहेत. भारत, ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देश आपल्या नागरिकांची सुटका करत आहेत. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देश इतर देशांच्या नागरिकांनाही सुदानमधून बाहेर पडण्यास मदत करत आहेत.

स्थलांतराला वेग

संघर्षामुळे सुदानमध्ये अंतर्गत स्थलांतर वाढण्याबरोबरच पन्नास हजारांहून अधिक नागरिकांनी शेजारील चड, इजिप्त, दक्षिण सुदान आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशांमध्ये आश्रय घेतला आहे. ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

बंगळूरमध्ये २२९ भारतीय दाखल

बंगळूर : संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेले आणखी २२९ भारतीय आज बंगळूर येथे दाखल झाले. ‘ऑपरेशन कावेरी’अंतर्गत भारत सरकारतर्फे ही बचाव मोहिम सुरु असून शनिवारीही ३६५ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १,९५४ भारतीयांना सुरक्षित आणण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.