Sundar Pichai : YouTube च्या माजी CEO सुसान वोज्स्की यांचे निधन, सुंदर पिचाईंनी शेअर केली खास आठवण

Youtube CEO Susan Wojcicki : सुसान वोज्स्की यांनी २०१४ पासून २०२३ पर्यंत Youtube सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचे नेतृत्व केले आहे.
Sundar Pichai
Sundar Pichai esakal
Updated on

Sundar Pichai share memories with susan wojcicki

Youtube च्या माजी सीईओ सुसान वोज्स्की या गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. वयाच्या ५६ व्या वर्षी आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुसान वोस्की यांचे पती डेनिस ट्रॉपर यांनी सोशल मिडियावरून ही बातमी दिली आहे.

पोस्टमध्ये ते म्हणाले की, पत्नी सुसान हिच्या निधनाची माहिती देताना अत्यंत वेदना होत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ती फुफुसांच्या कर्करोगाने ग्रस्त होती. ती पाच मुलांची आईही होती. आम्हाला पोरके करून ती गेली असेही ते म्हणालेत.

Sundar Pichai
Sundar Pichai: जागतिक मंदी आणि कर्मचारी कपातीच्या काळातही Google CEOची चांदी, मिळाले 'एवढ्या' कोटींचे पॅकेज

ही बातमी ऐकून धक्का बसला असल्याचे वक्तव्य Google Alphabet चे सीईओ सुंदर पिचाई यांनी केले आहे. सुंदर यांनी एक्सवर सुसानला श्रद्धांजली वाहली आहे. दोन वर्ष कॅन्सरला लढा देत असलेली माझी चांगली मैत्रिण सुसान आज आपल्याला सोडून गेली. एका चांगल्या मैत्रिणीला गमावल्याचे दु:ख कधीही भरून न येणारे आहे. गुगल कंपनीच्या इतिहासात तिचे स्थान अढळ राहील. ती एक उत्तम मैत्रिण, लीडर आणि व्यक्ती होती.

सुंदर यांनी स्वत:च्या इंटरव्ह्युच्या आठवणी जाग्या केल्या. पहिल्या भेटीतच सुसानच्या मोकळ्या व्यक्तीमत्त्वाचा अनुभव मला आला. माझा इंटरव्ह्युव घेतल्यानंतर तिनेच मला आईस्क्रीम खाणार का? असं विचारलं. आणि आईस्क्रीमनंतर ऑफिस कॅम्पस दाखवत तिने माझ्याशी गप्पाही मारल्या, असेही सुंदर म्हणाले.

Sundar Pichai
Sundar Pichai News : इंजिनिअर्ससाठी सुंदर पिचाई यांचे मार्गदर्शन : तंत्रज्ञानाची खोल समज गरजेची!

तिच्याशिवाय या जगाची कल्पना करणे कठीण आहे. तिच्या जाण्याचे दु:ख गुगल कंपनीशी संबंधित प्रत्येकाला होईल. मी गुगलचा एक असा व्यक्ती आहे जो ठामपणे म्हणू शकतो की, सुसान माझी मैत्रिण होती,असेही सुंदर चांगली म्हणाले आहेत.

सुसान वोज्स्की यांनी २०१४ पासून २०२३ पर्यंत Youtube सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचे नेतृत्व केले आहे. त्यांनी गुगल आणि Alphabet या नामांकीत कंपन्यांच्या सहकारी म्हणून देखील काम केले आहे.

फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार, १९९८ पासून गुगल आणि सुसानचे घनिष्ठ संबंध आहेत. सुजानचे एक गॅरेज होते जे सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज यांनी गुगलचे सर्च इंजिन विकसीत करण्यासाठी वापरले होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.