जगातील सर्वात महाग शहरांच्या यादीत 'या' शहरांचा समावेश

Tel Aviv
Tel Avivesakal
Updated on
Summary

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं नुकतीच जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी जाहीर केलीय.

World's Most Expensive Cities : इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं (Economist Intelligence Unit) नुकतीच जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी जाहीर केलीय. आधुनिकता, श्रीमंती किंवा उच्च राहणीमान या सगळ्या गोष्टींवरून जगातलं सर्वात महागडं शहर कोणतं म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर लंडन (London), पॅरिस (Paris), न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन येऊ शकतं. परंतु, आपल्या या सगळ्या अंदाजांना बाजूला सारत अनपेक्षितपणे एक वेगळंच शहर जगातलं सर्वात महाग शहर ठरलंय. या यादीत इस्रायलचे तेल अवीव शहर (Tel Aviv) पहिल्या क्रमांकावर आहे. बुधवारी प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसार, तेल अवीव हे जगातील सर्वात महागडे शहर आहे, जिथं वाढत्या महागाईमुळं जागतिक स्तरावर राहणीमानाचा खर्च वाढला आहे.

सर्वात महागड्या शहरांमध्ये पॅरिस आणि सिंगापूर (Singapore) संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, तिसऱ्या स्थानी झुरिच आणि चौथ्या स्थानी हाँगकाँग आहे. हमखास महागडं वाटणारं न्यूयॉर्क या यादीत सहाव्या स्थानी, तर जिविव्हा सातव्या स्थानी आहे. जिनिव्हापाठोपाठ आठव्या स्थानी कोपनहेगन, नवव्या स्थानी लॉस एंजेलिस आणि दहाव्या स्थानी जपानमधील ओसाका हे शहर आहे. तसेच दमास्कस हे राहण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त शहर असल्याचं सांगण्यात आलंय. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे (EIU) संकलित केलेल्या अधिकृत क्रमवारीत इस्रायली शहरानं प्रथमच पाच स्थानांची चढाई केलीय.

Tel Aviv
'कोरोनामुळं ज्यांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी मारलं'

तेल अवीवनं त्याच्या राष्ट्रीय चलनाच्या (National currency), तसेच वाहतूक आणि किराणा मालाच्या किमती वाढल्यामुळं अंशतः क्रमवारीत वर चढले आहे. या यादीत पॅरिस आणि सिंगापूर संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर झुरिच आणि हाँगकाँगचा क्रमांक लागतो. कोरोना (Coronavirus) काळानंतर वाहतूक, दळणवळण आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळंही हा फरक पडला असण्याची शक्यता आहे. यंदाची ही आकडेवारी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये गोळा करण्यात आली.

Tel Aviv
Political News : दोन दिवसांत ठरणार अध्यक्षपदाचा 'हुकमी एक्का'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()