पाकिस्तानात नेहमी काही ना काही अजब-गजब किस्से घडतच असतात.
पाकिस्तानात (Pakistan) नेहमी काही ना काही अजब-गजब किस्से घडतच असतात. नुकतेच येथील एका रेल्वे (Train) चालकाने दही खरेदी करण्यासाठी ट्रेन थांबवल्याचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. लाहोरमधील (Lahor) एका रेल्वे स्थानकाजवळ चालकाने ट्रेन थांबवल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. ही बाब लोकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. या विचित्र घटनेनंतर सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला. यानंतर तेथील रेल्वेमंत्र्यांनी दोघांना निलंबित केले.
वास्तविक, डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना लाहोरमधील काहना रेल्वे स्टेशनजवळ घडली. या ठिकाणी दही खरेदी करण्यासाठी जात असताना रेल्वे चालक आणि त्याच्या सहाय्यकाला सेवेतून निलंबित करण्यात आले. पाकिस्तानचे फेडरल रेल्वे मंत्री आझम खान स्वाती यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर मंत्र्यांनी ही कारवाई केली आहे.
रिपोर्टनुसार, या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात एक ट्रेन ड्रायव्हर चक्क रेल्वे थांबवून दुकानातून दही खरेदी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी रेल्वे विभागावर टीका करण्यास सुरुवात केली. या निष्काळजीपणामुळे अपघात होत असून सर्व गाड्या वेळेवर पोहोचत नाहीत, असे सांगण्यात आले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर मंत्र्यांनी कारवाई करत चालक राणा मोहम्मद शहजाद आणि त्याच्या सहाय्यकाला निलंबित करण्याचे आदेश लाहोर प्रशासनाला दिले. भविष्यात अशा घटना मी खपवून घेणार नाही आणि राष्ट्रीय संपत्तीचा वैयक्तिक कारणासाठी वापर करू देणार नाही, असा इशारा मंत्र्यांनी एका निवेदनात दिला आहे.
याआधी डिसेंबरमध्ये प्रवासादरम्यान लोकोमोटिव्ह ड्रायव्हर आणि मदतनीस यांच्या मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यांना सर्व गाड्यांमध्ये सेल्फी घेण्यास, व्हिडिओ आणि ऑडिओ संदेश रेकॉर्ड करण्यास देखील मनाई करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.