भारत-पाक मॅच बघायला गेलेल्या गृहमंत्र्यांना पाकने बोलावलं मायदेशी

 prime minister, imran khan, pakistan.
prime minister, imran khan, pakistan.sakal
Updated on
Summary

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद रविवारी होणारा टी २० वर्ल्ड कपमधील भारत पाक सामना पाहण्याासाठी गेले होते. मात्र इम्रान खान यांनी त्यांना तातडीने मायदेशी परत बोलावलं असून ते शनिवारी पाकिस्तानमध्ये पोहोचले.

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना युएईमधून मायदेशी परतावं लागलं आहे. देशात मोठा मोर्चा सुरु करण्याचा इशारा टीएलपीने दिला होता. टीएलपी प्रमुख हाफिज साद हुसैन रिजवी यांना नजरकैदेत ठेवल्याच्याविरोधात शुक्रवारी इस्लामाबादकडे लाँग मार्च काढू असं टीएलपीने म्हटलं होतं. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद रविवारी होणारा टी २० वर्ल्ड कपमधील भारत पाक सामना पाहण्याासाठी गेले होते. मात्र इम्रान खान यांनी त्यांना तातडीने मायदेशी परत बोलावलं असून ते शनिवारी पाकिस्तानमध्ये पोहोचले.

पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना देशातील परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना पंतप्रधान इम्रान खान यांनी मायदेशी बोलावलं. शेख रशीद हे शनिवारी पाकिस्तानात परत आल्याचे वृत्त पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजने दिलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युएईमध्ये होणारा सामना लाईव्ह पाहण्यासाठी शेख रशीद यांच्या सुट्टीच्या विनंतीला मंजुरी दिली होती. मात्र देशातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता त्यांना तातडीने माघारी बोलावण्यात आलं.

 prime minister, imran khan, pakistan.
भारत-पाक सामना देशहित आणि राष्ट्रधर्माविरुद्ध - रामदेव बाबा

बंदी असलेल्या कट्टरपंथी इस्लामी समूह तहरीक ए लब्बिक पाकिस्तानकडून इस्लामाबादपर्यंत लाँग मार्च काढण्याचा इशारा दिला गेला आहे. या मार्चला रोखण्यासाठी शनिवारी पाकिस्तानच्या अर्धसैनिक बलांनी ५०० हून अधिक कर्मचारी आणि १००० सीमा सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. टीएलपीच्या मुख्यालयापासून इस्लामाबादच्या दिशेनं शांततापूर्ण मार्च सुरु होईल असं सांगण्यात आलं होतं. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, टीएलपीच्या सदस्यांना इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्यापासून रोखण्यात आलं होतं.

रेड झोन आणि फैजाबाद इंटरचेंजसह त्याच्या आसपास सुरक्षा कर्मचारी तैनात केले जात आहेत. याशिवाय इस्लामाबादमध्ये प्रवेशासाठी असणाऱ्या सर्व मार्गाव प्रत्येकी २०० पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तसंच फैजाबाद आणि रेड झोनसह वेगवेगळ्या ठिकाणी १४०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. टीएलपीचे शेकडो कार्यकर्ते लाहोरमध्ये आंदोलनात सहभागी होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.