Mumbai Attack 26/11: मुंबई हल्ल्यामागील मास्टरमाईंडला भारताच्या हवाली करणार? अमेरिकन कोर्टाचा तहव्वूर राणाला दणका

Tahavur Rana: तहव्वूर राणा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहे. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.
Tahavur Rana Accused In Mumbai Attack 26/11
Tahavur Rana Accused In Mumbai Attack 26/11Esakal
Updated on

पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा याला अमेरिकन न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सुनावणी दरम्यान अमेरिकन न्यायालयाने सांगितले की, राणला भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.

या निर्णयानंतर तहव्वूर राणाचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची आशा वाढली आहे. तहव्वूर राणा 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai Attack 26/11) आरोपी आहे. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असे अमेरिकेच्या अपील न्यायालयाने सांगितले.

राणा यांनी दाखल केलेल्या अपीलावर निर्णय देताना, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील जिल्हा न्यायालयाने राणाची हेबियस कॉर्पस याचिका फेटाळलेली ती यूएस कोर्ट ऑफ अपीलच्या न्यायाधीशांच्या पॅनेलने कायम ठेवली.

राणाने आपल्या याचिकेत मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील कथित सहभागामुळे त्याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला आव्हान दिले होते. राणाचा कथित गुन्हा युनायटेड स्टेट्स आणि भारत यांच्यातील प्रत्यार्पण कराराच्या अटींनुसार येतो, असे समितीने म्हटले आहे.

Tahavur Rana Accused In Mumbai Attack 26/11
Monkeypox Virus In Pakistan : पाकिस्तानमध्ये आला मंकीपॉक्स.! पहिला रुग्ण आढळल्याने अलर्ट जारी, भारताची चिंता वाढली

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती असून, त्याच्यावर मुंबईत दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे.

ज्युरींने राणाला परदेशी दहशतवादी संघटनेला पाठिंबा दिल्याबद्दल आणि डेन्मार्कमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवले. मात्र, राणाकडे या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय आहे. त्याचे भारतात प्रत्यार्पण रोखण्यासाठी तो अजूनही सर्व कायदेशीर पर्याय वापरत आहे.

Tahavur Rana Accused In Mumbai Attack 26/11
Bangladesh Crisis : बुडत्याचा पाय खोलात! शेख हसीना यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

2008 मध्ये पाकिस्तानातून समुद्रामार्गे आलेल्या 10 लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी जवळपास 60 तास मुंबईला ओलीस ठेवले होते. यामध्ये दहशतवाद्यांनी 160 हून अधिक लोकांची हत्या केली होती.

प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी नऊ दहशतवाद्यांना जागीच ठार केले, तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले. ज्याला नंतर फाशी देण्यात आली.

मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २६ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.