taiwan tension US House of Representatives Speaker Nancy Pelosi lands in Taipei Taiwan
taiwan tension US House of Representatives Speaker Nancy Pelosi lands in Taipei Taiwan

युक्रेननंतर तैवानमध्ये युध्दाचे ढग; पेलोसी दाखल होताच चीनचा थेट इशारा

Published on

युक्रेन-रशिया युध्दानंतर आता तैवान मुद्द्यावरून जगातील दोन महासत्ता चीन आणि अमेरिका समोरासमोर आल्या आहेत. अमेरिकन सिनेटर नॅन्सी पेलोसी तैवान येथे दाखल झाल्या आहेत. चीनने अमेरिकेला दिलेल्या धमक्याच्या पार्श्वभूमिवर अमेरिकन सिनेटर पेलोसी यांना कडेकोट सुरक्षा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर चीनने अमेरिकेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे.

नॅन्सी पेलोसी यांची तैवान दौरा रोखण्यासाठी चीनच्या शक्तीप्रदर्शन करण्यात आले होत्या, त्याला न जुमानता पेलोसी अखेर तैवानची राजधानी तैपई येथील विमानतळावर उतरल्या आहेत. त्यानंतर चीनने अमेरिकेनं गंभीर परिणामांना तयार राहवं असा थेट इशारा दिला आहे.

गेल्या 25 वर्षात अमेरिकेत निवडून आलेल्या एकाही उच्चपदस्थ अधिकाऱ्याने तैवानला भेट दिलेली नसून, तैवानवर चीन दावा करत आलेला आहे. त्यात जर, नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चीनने दिला आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चिनी प्रभावावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती चीनला वाटतं असून, अमेरिका तैवानमध्ये फुटीरतावादी अजेंड्यावर काम करत असल्याचा चीनचा विश्वास असून, नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीमुळे याला अधिक बळ मिळेल असे चीनला वाटत आहे.

पेलोसी तैवानमध्ये गेल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला होता. तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयाच्या वेबसाइटवर मंगळवारी सायबर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर संकेतस्थळ काही काळासाठी बंद पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()