अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात प्रांतात तालिबानी सैनिक आणि नागरिकांच्या गटांत झालेल्या चकमकीत डझनहून अधिक लोक ठार झाले आहेत.
हेरात : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पश्चिमेकडील हेरात प्रांतात तालिबानी सैनिक (Taliban Fighters) आणि सशस्त्र नागरिकांच्या गटांत झालेल्या चकमकीत डझनहून अधिक लोक ठार झाले आहेत. स्थानिक रुग्णालयाचा अहवाला देत स्पुतनिकनं या घटनेची माहिती दिलीय. या गोळीबारात सात मुलं, तीन महिला आणि सात पुरुषांसह 17 नागरिकांचे मृतदेह आज हेरात प्रांतातील रुग्णालयात नेण्यात आले. या सर्वांचा मृत्यू हा गोळीबारात झाल्याचे स्पुतनिकनं सूत्राच्या अहवाल्यानं सांगितलंय.
अफगाण अधिकार्यांच्या मते, तालिबाननं रविवारी हेरातमध्ये अपहरणात सहभागी असलेल्या स्थानिक गुन्हेगारांविरुद्ध विशेष कारवाई सुरू केलीय. या त्यांच्या कारवाईत तीन गुन्हेगार ठार झाल्याचं समजतंय. 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान सत्तेवर आलंय. 2001 मध्ये अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर अफगाणिस्तानातून तालिबानची सत्ता हद्दपार झाली होती. तसेच अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करानं तालिबानला हटवलं आणि हमीद करझई यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. त्यानंतर तालिबानला सुमारे 20 वर्षे सत्तेपासून दूर राहावं लागलं. मात्र, आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.