कुराण अवमानप्रकरणी मॉडेल गजाआड; तालिबानची मनमानी कायम

निधीच्या सबबीसाठी मानवाधिकार विभागच बंद
Taliban arrest Afghan fashion model Ajmal Hakiki and three accomplices in Kabul for insulting Islam and scripture
Taliban arrest Afghan fashion model Ajmal Hakiki and three accomplices in Kabul for insulting Islam and scripturesakal
Updated on

इस्लामाबाद : इस्लाम धर्म आणि पवित्र ग्रंथाचा अवमान केल्याचा आरोप करत तालिबानने अफगाणिस्तानचा फॅशन मॉडेल अजमल हकीकी आणि त्याच्या तीन साथीदारांना काबूल येथे अटक केली. अटकेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात हकीकी आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकलेल्या दिसतात. अजमल हकीकी हा आपल्या फॅशन शो, यूट्यूब क्लिप्स आणि मॉडेल कार्यक्रमावरून सतत चर्चेत असतो.

अफगाणिस्तानात एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओ विनोदी कलाकार गुलाम साखी आणि मॉडेल हकीकी याच्याकडून इस्लाम धर्म आणि कुराणाचा अवमान झाल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजमल हकीकीसमवेत चार जणांना अटक करण्यात आली. या कारवाईनंतर तालिबानने अजमल हकीकी आणि त्याच्या साथीदाराचा व्हिडिओ जारी केला. यात ते तालिबान सरकारची माफी मागताना दिसतात. या व्हिडिओसमवेत एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले की, कोणालाही पवित्र कुराणाचा अवमान करण्याचा अधिकार नाही.

मानवाधिकार विभाग बंद

दरम्यान, अलीकडेच तालिबानने मानवाधिकार संस्थांसह चार विभाग कायमस्वरूपी बंद केले आहेत. निधीची कमतरता असल्याने याचा खर्च करणे परवडत नसल्याचे तालिबानचे म्हटले आहे. मानवाधिकार आयोगासारख्या अन्य विभागांना अनावश्‍यक बाब असल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबान सरकारचा उपप्रवक्ता इनामुल्लाह समांगनी यांनी म्हटले, की हे विभाग गरजेचे नसल्याने त्यांना अर्थसंकल्पात स्थान दिले नाही. यात मानवाधिकार आयोगाशिवाय घटना लागू करण्यासाठीच्या आयोगाचा देखील समावेश होता.

हकीकीची मुक्तता करण्याची ॲन्मेस्टी संघटनेची मागणी

न्यूयॉर्क : यूट्यूबर अजमल हकीकी आणि त्याच्या सहकाऱ्यांना तत्काळ सोडावे, अशी मागणी ॲन्मेस्टी संघटनेने केली आहे. ॲन्मेस्टीच्या दक्षिण आशिया विभागाच्या प्रमुख समीरा हमिदी यांनी म्हटले की, हकीकी आणि त्याच्या सहकाऱ्यांना तालिबान शासनकर्त्यांनी मनमानीप्रमाणे ताब्यात घेतले असून त्यांना माफी मागण्यासाठी प्रवृत्त केले आहे. हा एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. परंतु तालिबानने कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय हकीकी आणि त्याच्या सहकाऱ्यांची मुक्तता करायला हवी. आपले विचार मुक्तपणे मांडणाऱ्या लोकांवर सेन्सॉरशीप लादण्याच्या प्रकाराचा अॅन्मेस्टी संघटनेने नेहमीच निषेध केला आहे. ‘अभिव्यक्ती’वर कायदेशीर मार्गाने निर्बंध आणायला हवेत आणि त्याचा वापर योग्य उद्देशासाठी व्हायला हवा, असे संघटनेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.