तालिबानी कमांडर्सनी घेतला अफगाण राष्ट्रपती भवनाचा ताबा

तालिबानी कमांडर्सनी घेतला अफगाण राष्ट्रपती भवनाचा ताबा
Updated on

काबुल : तालिबानच्या कमांडर्सनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला असल्याचं जाहिर केलंय. अफगाणिस्तानात सध्या मोठी अनागोंदी सुरु असून तालिबान्यांनी अर्ध्या अधिक अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. आज सकाळी त्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूल हे शहरही ताब्यात घेतलं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अफागाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडला आहे, टोलो न्यूजच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

  • अफगाणिस्तानातील काबुलमधील अमेरिकन दूतावासाने सिक्योरिटी अलर्टमध्ये म्हटलंय की, विमानतळासह काबूलमधील सुरक्षा परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. विमानतळाला आग लागल्याच्या बातम्या आहेत.

तालिबानी कमांडर्सनी घेतला अफगाण राष्ट्रपती भवनाचा ताबा
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी सोडला देश - टोलो न्यूज

अफगाणिस्तानातील काबुल येथून 129 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विमान AI244 दिल्लीत उतरलं आहे. जगाने अफगाणिस्तानकडे पाहणं सोडून दिलंय, यावर माझा विश्वास बसत नाही. आमचे तिथले मित्र मारले जाणार आहेत. ते (तालिबान) आम्हाला मारणार आहेत. आमच्या महिलांना यापुढे कोणतेही अधिकार मिळणार नाहीत, ”असे काबूलहून दिल्लीत आलेल्या एका महिलेने सांगितले.

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटलंय की, लूट आणि अराजकता रोखण्यासाठी त्यांच्या तालिबानी सैन्याने काबुल आणि अफगाणिस्तानच्या काही भागात प्रवेश करतील आणि सुरक्षा दलांनी रिकामी केलेल्या चौकी ताब्यात घेतील. त्यांनी शहरात केलेल्या या प्रवेशामुळे लोकांनी घाबरू जाऊ नये, असे आवाहन केलं आहे.

एचसीएनआरचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अफगाण सैन्याला सहकार्य करण्यास सांगितलंय. काबूल शहरात प्रवेश करण्यापूर्वी चर्चेसाठी थोडा वेळ देण्यासंदर्भात तालिबानला आवाहन केलंय. त्यांनी अश्रफ घनींचा उल्लेख 'माजी राष्ट्रपती' असा केला असून घनी यांनी देश सोडून गेल्याचं त्यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.