अफगाणच्या चिंतेत वाढ, राजधानी काबुलमध्ये घुसले तालिबानी

अफगाणच्या चिंतेत वाढ, राजधानी काबुलमध्ये घुसले तालिबानी
Gulabuddin Amiri
Updated on

अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्याच्या दिशेने तालिबानचे दहशतवादी वेगाने पुढे सरकत असून राजधानी काबूलमध्ये आता घुसखोरी केली आहे. काबुलच्या वेगवेगळ्या सीमाभागांतून तालिबान्यांनी प्रवेश केला. तालिबानच्या दहशतवाद्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. आता जवळपास सर्वच सीमाभागांतून तालिबानच्या तहशतवाद्यांनी काबूलमध्ये प्रवे केला आहे. रॉयटर्सने अफगाणिस्तान सरकारच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. काबुलमध्ये काही ठिकाणी बॉम्ब आणि गोळीबाराचा आवाज येत आहे. मात्र, तालिबान्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, आम्हाला सक्तीने अथवा बळाचा वापर करुन काबुलवर कब्जा करायचा नाही.

तालिबानने कंदहार, गझनी, हेरत, कुंडूझ जलालाबाद आणि लोगार प्रांत जिंकल्यानंतर काबूलकडे आपला मोर्चा वळवला आहे. तालिबान्यांच्या आक्रमकपणामुळे अफगाणिस्तान आता पुन्हा एकदा अनागोंदीच्या वातावरणात सापडणार असल्याचं दिसतेय. याचबरोबर उत्तर अफगाणिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफवर चोहोबाजूंनी हल्ले सुरू केले आहेत. उत्तर अफगाणिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफवर तालिबानने चोहोबाजूंनीच हल्ले सुरू केले असून जवळपास कब्जा मिळवला आहे.

अफगाणच्या चिंतेत वाढ, राजधानी काबुलमध्ये घुसले तालिबानी
पुण्यासह सात जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली

अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान संघटना पुन्हा सक्रिय झाली असून अफगाणिस्तानच्या उत्तर, पश्‍चिम आणि दक्षिणकडील प्रांत त्यांनी तीन आठवड्यात हस्तगत केले आहेत. अमेरिकेने मे महिन्यापासून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास प्रारंभ केला. हळूहळू अमेरिकी सैनिक मायदेशी परतु लागले आणि तालिबानच्या कारवाया वाढू लागल्या. गेल्या महिनाभरात तालिबानने वेगाने हालचाली केल्या. त्यातूनच आजपर्यंत 34 पैकी 30 प्रांतावर त्यांनी ताबा मिळविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.