महिलांचे धाडस! तालिबानसमोर काबुलच्या रस्त्यावर महिलांची निदर्शने

तालिबानची जुलमी राजवट टाळण्यासाठी हजारो अफगाणि नागरिक देशाबाहेर जात आहेत.
महिलांचे धाडस! तालिबानसमोर काबुलच्या रस्त्यावर महिलांची निदर्शने
(Photo: Twitter/@AlinejadMasih)
Updated on

काबूल: तालिबानची (Taliban) जुलमी राजवट टाळण्यासाठी हजारो अफगाणि नागरिक देशाबाहेर जात आहेत. या परिस्थितीत अफगाणिस्तानात (Afganistan) महिलांच्या एका गटाने रस्त्यावर उतरुन आपल्या हक्कांसाठी निदर्शने (women protest) केली. इराणी पत्रकार मासीह अलीनीजाद (Iranian journalist Masih Alinejad) यांनी टि्वटरवर या महिलांच्या आंदोलनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये महिलांनी एक कागद हाती पकडलेला आहे. त्यावर त्यांच्या मागण्या आहेत.

महिलांचे धाडस! तालिबानसमोर काबुलच्या रस्त्यावर महिलांची निदर्शने
तालिबान्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेतील 'हे' १५ मुद्दे

या महिलांच्या अवती-भवती हातात बंदुका घेतलेले तालिबानी बंडखोर आहेत. काबुलच्या रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या या महिलांनी त्यांच्या अधिकारांची मागणी केली आहे. सामाजिक सुरक्षा, नोकरी, शिक्षणाचा आणि राजकारणात सहभागाचा अधिकार देण्याची मागणी त्यांनी केलीय. "आम्ही गेल्या काही वर्षात जे मिळवलय, त्यावर तडजोड करावी लागू नये तसेच आमचे अधिकार अबाधित रहावेत'' असे या महिला व्हिडीओमध्ये बोलताना दिसतात.

महिलांचे धाडस! तालिबानसमोर काबुलच्या रस्त्यावर महिलांची निदर्शने
VIDEO व्हायरल झालेल्या 'त्या' C-17 च्या चाकाजवळ आढळले मृतदेह

अफगाणिस्तानातील मोठा माध्यम समूह असलेल्या टोलो न्यूजने आपल्या स्क्रिनवर पुन्हा एकदा महिलांना स्थान दिले आहे. तालिबानची सत्ता येणार हे दिसल्यानंतर त्यांनी महिला अँकर्सचे बुलेटीन बंद केले होते. रविवारी तालिबानने काबुल ताब्यात घेतल्यानंतर अनेक महिलांनी जीवाच्या भीतीने देश सोडला. दिल्लीत दाखल झालेल्या एका अफगाणि महिलेला मायदेशात राहणाऱ्या मैत्रिणींच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.