काबूल : इस्लामी कायद्याच्या चौकटीमध्ये महिलांचे अधिकार मान्य करतानाच तालिबानच्या (taliban) प्रवक्त्याने आज जगातील कोणत्याही देशाने आम्हाला घाबरू नये, इस्लाममधील नियमांनुसार देशाचा कारभार चालेल असे म्हटले आहे.
तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद याने आज प्रथमच माध्यमांना सामोरे जात संघटनेची भूमिका स्पष्ट केली. महिलांच्या अधिकारांचे आम्ही संरक्षण करू असे मुजाहिदने म्हटले आहे.खासगी माध्यमांनी स्वतंत्रच राहावे असे सांगताना त्याने पत्रकारांनी राष्ट्रीय मूल्यांच्याविरोधात वागू नये असे नमूद केले. अन्य देशांना लक्ष्य करू पाहणाऱ्या कोणत्याही गटाला आमच्या भूमीवर आश्रय दिला जाणार नाही असेही त्याने सांगितले. अफगाणिस्तानचे आम्ही संरक्षण करू, आम्हाला कुणाचाही बदला घ्यायचा नाही असे सांगत त्याने लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळ्यांनाच माफ केल्याचेही त्याने स्पष्ट केले.
मुजाहिद म्हणाला
अन्य देशांनी अफगाणी नियमांचा सन्मान करावा
परकी दूतावासाला आम्ही हात लावणार नाही
अफगाणिस्तानात पूर्णपणे इस्लामी राजवट असेल
आम्हाला सगळ्या जगाने मान्यता दिली आहे
स्थानिक तरुणांनी येथे राहून देशाची सेवा करावी
स्थानिकांनी राष्ट्रीय ऐक्य, मूल्यांना महत्त्व द्यावे
महिलांनी शरियतच्या नियमानुसार वागणे गरजेचे
जगाने अफगाणिस्तानात गुंतवणूक करायला हवी
नवे सरकार आता देशाचे कायदे निश्चित करेल
आम्हाला अफगाणिस्तानची सेवा करायची आहे
माध्यमांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार
अन्य देशांचे नियम, कायद्यांचा सन्मान करू
अफगाणिस्तान अंमली पदार्थ मुक्त देश होईल
लढाईसाठी वापरलेली शस्त्रे गोळा केली जातील
वीस वर्षांच्या संघर्षानंतर आम्ही येथे पोचलो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.