Taliban: मुलींचे 'तिसरी'नंतर होणार शिक्षण बंद; अफगाणिस्तानात 'तालिबानी' निर्णय

Taliban Government: अफगाणिस्तान पुन्हा अश्मयुगात जातोय की काय अशी शंका येऊ लागली आहे
taliban school girl
taliban school girlesakal
Updated on

Taliban Government:

नवी दिल्ली- तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून तेथील सर्वसामान्य नागरिकांचे जिवन कष्टमय झाले आहे. तालिबान सरकार दररोज नवनवीन प्रतिगामी निर्णय घेत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा अश्मयुगात जातोय की काय अशी शंका येऊ लागली आहे. तालिबानने एक नवा फतवा काढला असून मुलींच्या तिसऱ्या वर्गाच्या पुढे शिकण्यावर बंदी आणली आहे. तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांना याबाबत इशारा दिला आहे. याआधी तालिबानमधील मुलींना सहावीच्या वर्गापर्यंत शिकण्याची परवानगी होती, पण त्यात आणखी घट करण्यात आली आहे.

बीबीसीने यासंदर्भातील रिपोर्ट देताना म्हटलंय की, तालिबान सरकारमधील शिक्षण अधिकाऱ्यांनी गजनी प्रांतातील शाळा आणि शैक्षणिक संस्थाना इशारा दिलाय. दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तिसरीपर्यंतच मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी असेल. तालिबान सरकारच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानातील महिला सामाजिक कार्यक्षेत्रातून हद्दपार होण्याची शक्यता आहेत.

taliban school girl
Amit Shah in Pune: 'दादा, बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात'; अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

रिपोर्टनुसार, तालिबान अधिकाऱ्यांनी शाळांना सुचना दिल्या आहेत की, त्यांनी दहा वर्षांपुढील वयाच्या मुलींना शाळेत प्रवेश देऊ नये. तसेच सध्या शिकत असलेल्या मुलींना घरी परत पाठवावे. तालिबानने महिलांवर बंधनं आणल्यानंतर संयुक्त राष्ट्राने टीका केली होती. तालिबान महिलांचे अधिकार आणि हक्क संकुचित करत असल्याचं संयुक्त राष्ट्रानं म्हटलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्याचा तालिबान सरकारवर किंचितही फरक पडलेला नाही.

taliban school girl
Nuh Violence: नूह हिंसाचारात पाकिस्तानी कनेक्शन?; पोलिसांकडून तपास, 200 जणांना अटक

दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबान सरकारने मुलींच्या माध्यमिक शिक्षणावर बंदी आणली होती. तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण फक्त मुलांसाठी सुरु करण्यात यावेत अशा सुचना देण्यात आल्या होता. मागील वर्षी डिसेंबरमध्ये तालिबानने कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या मुलींवर बंदी आणली होती. तालिबान सरकारने महिलांना सार्वजनिक ठिकाणी काम करण्यास बंदी घातली होती. तसेच महिलांना स्थानिक आणि बिगर-सरकारी संस्थांमध्ये काम करण्यास विरोध केला होता. दरम्यान, अफगाणिस्तानमधील सरकार उलथवून तालिबान सरकार पुन्हा सत्तेत आले. तालिबान राजवटीत महिलांच्या अधिकारांवर अनेक बंधनं आणली जाणार असं बोललं जात होतं, ते खरं ठरताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.