Taliban: भारताला डिवचण्यासाठी लष्करी तुकडीला दिले 'पानिपत' नाव

अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर हा देश तालिबान्यांच्या ताब्यात गेला आहे.
Taliban
TalibanSakal
Updated on

काबुल : अफगाणिस्तानातील अंतरिम तालिबान (Taliban) सरकारची भारतविरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली असून, तालिबानने त्यांच्या नव्या लष्करी सैन्य तुकडीचे नाव 'पानिपत' (Panipat Third Battal) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 'पानिपत युनिट' पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात तैनात केले जाणार आहे. दरम्यान, तालिबानच्या या कृतीनंतर नेटिझन्सनी ही कृती म्हणजे शेजारील राष्ट्र भारताला डिवचण्याची हिंसक कृती असल्याचे म्हटले आहे. 1761 मध्ये हरियाणामध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती, ज्यात तत्कालीन अफगाण शासक अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला होता. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर हा देश तालिबान्यांच्या ताब्यात गेला आहे. (Taliban Govt Announced Militry UnitName On Third Battle Of Panipat )

Taliban
लायसन्सशिवायही 12वी पास व्यक्ती करू शकणार मेडिकल व्यवसाय

नांगरहारच्या पूर्व प्रांतात तैनात होणार सैन्य

याबाबत अफगाणिस्तानच्या अमेज न्यूजने केकेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पानिपत ऑपरेशनल युनिट' ची तैनाती देशाच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतात केली जाणार आहे. हा प्रांत पाकिस्तानच्या सीमेला लागून असून, या ट्विटमध्ये एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. या फोटोत लष्कराच्या या नव्या तुकडीतील सैनिक मास्क तसेच गणवेशात दिसून येत आहेत. तसेच सैनिकांच्या हातात अमेरिकन रायफल दिसत आहेत. दरम्यान, हा फोटो राजधानी जलालाबादमधील सैनिकांच्या परेडचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Taliban
Bushra Bibi : रहस्यमय आहे इम्रान खानची पत्नी; स्वतःला संबोधते...

मशिदींमध्ये सांगितल्या जातात या कथा

अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागातील मशिदींमध्ये 'पानिपत' सारख्या युद्धांबद्दलच्या कथा सांगितल्या जातात. त्यासोबतच जगभरात जिथे जिथे मुस्लिम संकटात सापडले आहेत तिथे त्यांच्या समर्थनासाठी यावे असे देखील आवाहन केले जाते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मशिदींमध्ये काश्मीर आणि पॅलेस्टाईनवर अनेकदा चर्चा केली जाते.

Taliban
तालिबान बदललं असेल, पण चीन-पाकिस्तान बदललंय का?- मोहन भागवत

सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया

तालिबानच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून, काहींनी या निर्णयाचे कौतुक केले, तर काहींनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तालिबान्यांचे हे पाऊल भारतासोबतच्या समस्यांमुळे पाकिस्तानने दिलेल्या आदेशाचा परिणाम असल्याचे मत एका ट्विटर युजरने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()