तालिबान विरोधात लोक रस्त्यावर उतरले, जलालाबादमध्ये गोळीबार

तालिबानच्या झेंड्याऐवजी (Afgan flag) अफगाणिस्तानचा झेंडा फडकवण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.
जलालाबाद
जलालाबाद (Photo Credit: Twitter/@Iqbal__Kholidi)
Updated on

जलालाबाद: अफगाणिस्तानवर तालिबानने (Afganistan taliban) वर्चस्व मिळवल्यापासून तिथे वेगवान घडामोडी घडत आहेत. हजारो नागरिकांना अफगाणिस्तानला सोडून दुसऱ्या देशात आसरा घ्यायचा आहे. त्याचवेळी देशांतर्गतही तालिबानला काही ठिकाणी विरोध होत आहे. काबूलमध्ये (kabul) काही महिला आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या तसंच अफगाणिस्तानच्या जलालाबाद (Jalalabad protest) शहरात बुधवारी लोक रस्त्यावर उतरले होते. जलालाबादमधील कार्यालयांवर तालिबानच्या झेंड्याऐवजी (Afgan flag) अफगाणिस्तानचा झेंडा फडकवण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.

जलालाबादमधील लोकांचा हा विरोध तालिबानला अजिबात रुचला नाही. त्यांनी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या. इंडिया टुडेने अफगाणिस्तानातील पाजवोक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या काही पत्रकारांनाही तालिबानने मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ टि्वटरवर पोस्ट केले आहेत.

जलालाबाद
डॅशिंग कार खेळल्यानंतर तालिबान्यांनी अम्युझमेंट पार्कचं पेटवून दिलं?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेकडो नागरिक अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. जमावाची पळापळ सुरु असताना गोळ्यांच्या फैरीचे आवाज ऐकू येतात.

जलालाबाद
'तालिबानला माझा सलाम', भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाच्या सदस्याकडून कौतुक

महिलांनी केलं आंदोलन

तालिबानची (Taliban) जुलमी राजवट टाळण्यासाठी हजारो अफगाणि नागरिक देशाबाहेर जात आहेत. या परिस्थितीत अफगाणिस्तानात (Afganistan) महिलांच्या एका गटाने रस्त्यावर उतरुन आपल्या हक्कांसाठी निदर्शने (women protest) केली. इराणी पत्रकार मासीह अलीनीजाद (Iranian journalist Masih Alinejad) यांनी टि्वटरवर या महिलांच्या आंदोलनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये महिलांनी एक कागद हाती पकडलेला आहे. त्यावर त्यांच्या मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.