काबूल : अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमिरातीसोबत (UAE) अफगाणिस्तानचे विमानतळ चालवण्याबाबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तुर्की, कतार आणि संयुक्त अरब अमिराती या देशांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचं अफगाणिस्तानातील दळणवळण आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितलं आहे. त्यानंतर अफगाणिस्तानातील विमानतळाचे व्यवस्थापन संयुक्त अरब अमिराती करणार आहे.
(Taliban Sign Deal With UAE to Run Afghan Airports)
तालिबानचे दळणवळण आणि नागरी वाहतूक उपमंत्री गुलान जैलानी आफा यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा करार मंगळवारी तालिबानचे पहिले उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल बरादार यांच्या उपस्थितीत झाला. देशातील सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्यामुळे आम्ही परदेशी गुंतवणुकदारांसोबत काम करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.
या करारावेळी बोलताना तालिबानचे उपपंतप्रधान म्हणाले की, "सर्व देशातील विमाने आता तालिबानमधून सुरक्षितरित्या उड्डाणे करतील." जेव्हा जेव्हा आम्हाला काही अडचणी आल्या तेव्हा संयुक्त अरब अमिरातीने आम्हाला तंत्रज्ञानासाठी मदत केली असं दळणवळण आणि नागरी वाहतूक मंत्री वाफा म्हणाले. "GAAC कॉर्पोरेशन ही UAE मधील एक बहुराष्ट्रीय विमान सेवा देणारी कंपनी आहे." असंही यावेळी वाफा म्हणाले.
डिसेंबर 2021 मध्ये, तुर्की आणि कतारी कंपन्यांनी काबूल. बल्ख, हेरात, कंदाहार आणि खोस्ट प्रांतातील विमानतळ चालवण्यासाठी स्वाक्षरी केली होती, पण त्या सध्या अफगाणिस्तानमधील आर्थिक परिस्थितीमुळे डबघाईला आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.