Terror attack in Sydney: सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला! अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Terror attack in Sydney: सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेकांचा चाकू हल्ला करून आणि गोळीबारात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे
Terror attack in Sydney
Terror attack in SydneyEsakal
Updated on

Terror attack in Sydney: ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. सिडनीतील एका मॉलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही प्राथमिक माहिती समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक सर्वत्र धावू लागले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मॉलमध्ये अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेकांचा चाकू हल्ला करून आणि गोळीबारात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडनीच्या बोंडी जंक्शन येथे अनेकांवर वेस्टफिल्डमध्ये मोठ्या प्रमाणात चाकूने वार केल्याने चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि तर अनेक जण जखमी झाले आहेत.

आज शनिवारी ही घटना घडली आहे. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने news.com.au ला सांगितले की, त्यांनी लेव्हल 4 वर जेडी स्पोर्ट्स स्टोअरसमोर दोन तरुणांचे मृतदेह पाहिले, याचे काही सीसीटिव्ही फुटेजही समोर आले आहेत. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याचे दिसून येत आहेत.

Terror attack in Sydney
Bhadresh Kumar Patel: गुजरातच्या तरुणाची अमेरिकन पोलिसांना हुलकावणी! माहिती देणाऱ्याला मिळणार 2 कोटींचे बक्षिस, काय आहे नेमकं प्रकरण

न्यू साउथ वेल्स राज्य पोलिसांनी सांगितले की संपूर्ण मॉलला घेरण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक पोस्ट्समध्ये मॉल आणि पोलिसांच्या वाहनांमधून आणि आपत्कालीन सेवांमधून लोक पळत असल्याचे दिसून आले आहे, मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते, त्यापैकी एक ठार झाला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे

Terror attack in Sydney
UN experts slam Pakistan: हिंदू-ख्रिश्चन महिलांचे सक्तीने विवाह अन् धर्मांतर; संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानला फटकारलं

रिपोर्टनुसार हा दहशतवादी हल्ला बोंडी जंक्शन येथे झाला. सिडनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा उद्देश दुकानदारांना टार्गेट करण्याचा होता. मॉल कॅम्पसमध्ये आपत्कालीन सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला, त्यानंतर लोक तेथून पळताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.