Pulwama Attack 2019: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी आणि कुख्यात 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर याचे पाकिस्तानच्या हाफिजाबादमधून 'अज्ञात' लोकांनी अपहरण केले आहे. डेरा हाजी गुलाम येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपहरणासाठी जबाबदार असलेल्या अज्ञात कारस्वारांचा शोध लागलेला नाही.
मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर यांनी 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये मुख्य भूमिका बजावली होती. ज्यात 40 हून अधिक केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याने जागतिक स्तरावर मोठी खळबळ माजली होती. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता.
औरंगजेब एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात असताना पाकिस्तानातील हाफिजाबाद येथे त्याचे कथित अपहरण करण्यात आले. एका नातेवाईकासह अज्ञात कार स्वारांनी त्याला अडवले आणि जबरदस्तीने ताब्यात घेतले असे एका अहवालात म्हटले आहे. औरंगजेब आणि त्याच्या नातेवाईकांचा ठावठिकाणा अद्याप कुणाला माहिती नाही.
अपहरणाच्या प्रत्युत्तरात, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि पाकिस्तानी लष्करासह पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अज्ञात अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी हाफिजाबाद परिसरात अनेक छापे टाकले आहेत. मात्र त्यांना यश आले नाही.
एप्रिल 2022 मध्ये भारताने मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीरला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. आलमगीर जैशच्या निधी संकलनाच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवतो आणि हा निधी काश्मीरला जातो. अफगाण जवानांची घुसखोरी करण्यात आणि जम्मू-काश्मीरमधील भारतीय सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. (Latest Marathi News)
गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या तरतुदींनुसार आलमगीरला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते. मंत्रालयानुसार, आलमगीरची ओळख मकतब अमीर, मुजाहिद भाई, मुहम्मद भाई, यासह अनेक उपनावांनी केली जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.