२६ नोव्हेंबर २००८ रोजी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला झाला होता. हा हल्ला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने केला होता. या संघटनेशी अजमल कसाब (Ajmal Kasab) याचा संबंध होता. दहशतवादी अजमल कसाब हा पाकिस्तानचा नागरिक (Pakistani citizens) होता, असे पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी बुधवारी (ता. २०) कबूल केले आहे. तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्याची माहिती भारताला दिल्याचा आरोपही केला आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यावेळी अजमल कसाबला सोडून सर्वच दहशतवादी ठार मारल्या गेले होते. यावेळी हॉटेल ताज, द ओबेरॉयसह गर्दीच्या ठिकाणी हल्ले झाले होते. तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस, नरिमन हाउस आणि इतर ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले.
या दहशतवादी हल्ल्यात एकूण १७४ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ३०० जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी हिंदू असल्याचे दाखवण्यासाठी हिंदू धार्मिक चिन्हे परिधान केली होती. कसाबला (Ajmal Kasab) जिवंत पकडण्यासाठी उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे यांनी बलिदान दिले होते. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबला फाशी देण्यात आली होती.
पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची तपशीलवार माहिती भारताला दिली होती. नवाज शरीफ यांनीच अजमल कसाबच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती भारताला दिली होती, असा दावा बुधवारी पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे उपस्थित असलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
... तर मी शिक्षा भेगायला तयार
नवाज शरीफ यांनी अजमल कसाबचा (Ajmal Kasab) पाकिस्तानातील फरीदकोट येथील पत्ता भारताला दिला. जर कोणी मला चुकीचे सिद्ध केले तर मी शिक्षा भेगायला तयार आहे, असेही मंत्री शेख रशीद म्हणाले. शरीफ यांना मुअम्मर गद्दाफी, ओसामा बिन लादेन आणि सद्दाम हुसेन यांच्याकडून निधी मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला.
इम्रान खान तुम्ही लढत रहा
इम्रान खान(Imran Khan) तुम्ही लढत रहा. मी तुमच्या बरोबर आहे. मला अभिमान आहे की मी इम्रान खानसोबत राजकारण केले. ज्यांनी खानला सोडले ते पुन्हा त्यांच्यासोबत सामील होतील, असे इम्रान खानशी जोडले गेल्यानंतर ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.