Pakistan: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले, 6 पोलीस अन् 12 दहशतवादी ठार

Balochistan Attack: खैबर पख्तूनख्वामध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आठ दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
Balochistan|Khyber Pakhtunkhwa
Balochistan|Khyber PakhtunkhwaEsakal
Updated on

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात गेल्या दोन दिवसांत झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात 12 दहशतवादीही ठार झाले आहेत.

पाकिस्तान सशस्त्र दलाची मीडिया शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने सांगितले की, बलुचिस्तान प्रांतात चार दहशतवादी मारले गेले आहेत.

ते पुढे म्हणाले की, खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची तालुक्याच्या कोट सुलतान भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आठ दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

खैबर पख्तुनख्वाच्या लक्की मारवत येथे शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक आणि दोन पोलिस ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी एक हवालदारही जखमी झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, उपअधीक्षकांनी ईद उल फित्र सणापूर्वी सुरक्षा भक्कम करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह पेशावर-कराची महामार्गावर एक तात्पुरती चौकी स्थापन केली होती.

Balochistan|Khyber Pakhtunkhwa
Gwadar Port: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 'कच्छथिवू'नंतर आता 'ग्वादार' आलं चर्चेत; नेहरुंनी नाकारली ऑफर, मग पाकिस्तानने घेतलं गाव

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी या चौकीतून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या वाहनांवरही गोळीबार केला, त्यात उपअधीक्षक आणि हवालदाराचा मृत्यू झाला.

दरम्यान, शुक्रवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी सारा दर्गा भागात हवालदार सनमत खान यांच्यावर गोळीबार केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. बाजौर जिल्ह्यातील मामुंद तालुक्यात शनिवारी झालेल्या स्फोटात एक पोलीस अधिकारी ठार तर दुसरा जखमी झाला.

Balochistan|Khyber Pakhtunkhwa
New Zealand New Visa Rules: न्यूझीलंडच्या व्हिसा नियमांचा भारतीयांना मोठा झटका; जाणून घ्या काय आहेत नवे बदल

याशिवाय शनिवारी रात्री टँक जिल्ह्यातील मियाँ लाल पोलीस चौकीजवळ एका हवालदाराची अज्ञातांनी हत्या केली होती. लक्की मारवत येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.