पाकिस्तानमध्ये लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला, चार दहशतवादी ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात लष्कराच्या दोन ठिकाणांवर दहशतवादी हल्ले
Pakistan
Pakistanesakal
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी रात्री (ता.दोन) लष्कराच्या दोन ठिकाणांवर दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान नॅशनलिस्ट आर्मीने घेतली आहे. बुलचिस्तान प्रांतात बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन ठिकाणांवर हल्ला केला. यात एक जवान आणि चार दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान नॅशनलिस्ट आर्मीने घेतली आहे. पाकिस्तान (Pakistan) लष्कराच्या जनसंपर्क विभागानेतर्फे (आयएसपीआर - Inter-Services Public Relations) सांगण्यात आले की बलुचिस्तानच्या नौशकी आणि पंजगुरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरील फ्रंटियर कोरच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला करुन त्यात घुसण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हल्ले परतवून लावण्यात आले. गोळीबारात दहशतवाद्यांना पिटाळून लावले गेले. सेनेने सांगितले, की पंजगूरमध्ये सैन्याने वेळेत प्रत्युत्तर देऊन दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले. (Terrorist Attacks On Army Camps In Balochistan Province Of Pakistan)

Pakistan
दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये पावसामुळे हाहाकार, २४ जणांचा मृत्यू

गोळीबारात एक सैनिक मारला गेला. दहशतवादी घटनास्थळावरुन पळून गेले. आयएसपीआरने आपल्या पत्रकात म्हटले, की दहशतवाद्यांनी नौशकीत फ्रंटियर कोर कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पळवून लावण्यात आले. दरम्यान चार दहशतवाद्यांना मारण्यात आले. बलुचिस्तान (Balochistan) नॅशनलिस्ट आर्मीने सांगितले, की नौशकी आणि पंजगुरमध्ये फ्रंटियर कोर मुख्यालयावर हल्ला केला होता. आत्मघाती हल्लेखोर यशस्वीरित्या सुरक्षा दलांच्या शिबीरात घुसले. त्यात अनेक लोग मारले गेले. घटनेच्या उपस्थित लोकांना सांगितले की स्फोट आणि गोळीबारामुळे फ्रंटियर कोर मुख्यालयाच्या आसपासच्या भागात दहशत परसली होती. एक आठवड्यापूर्वी बलुचिस्तानच्या केच भागात सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Pakistan
आता चीन पाकिस्तानला अंतराळ मोहिमेतही करणार मदत, उपग्रह पाठवणार

यात १० सुरक्षा कर्मचारी मारले गेले. यात एक दहशतवादीही मारला गेला होता. यापूर्वी १४ डिसेंबर रोजी पाकिस्तान-इराण सीमेजवळ एका तपास नाक्यावर झालेल्या हल्ल्यात एक सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे १३ नोव्हेंबर रोजी बलुचिस्तानच्या होशब भागात एका मोहिमेत दोन जवाम मारले गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()