कॅनडात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारचा भीषण अपघात झाल्यानंतर तिच्या सुरक्षा डिझाईनवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 24 ऑक्टोबर रोजी, कॅनडाच्या टोरोंटो शहरात झालेल्या या दुर्घटनेत चार भारतीय मित्रांचा जिवंत जळून मृत्यू झाला होता. या चारही भारतीयांचा भारतातील गुजरात राज्याशी संबंध होता. मृतांमध्ये केताबा गोहिल (29) आणि तिचा भाऊ नीलराज (25), जयराजसिंह सिसोदिया, आणि दिग्विजय पटेल यांचा समावेश आहे.