Apple नं आपल्या App Store वरून Twitter काढून टाकण्याची दिली धमकी; मस्कचा गंभीर आरोप

आयफोन बनवणाऱ्या कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात देणंही बंद केल्याचा आरोप मस्क यांनी केलाय.
Apple vs Twitter
Apple vs Twitteresakal
Updated on
Summary

आयफोन बनवणाऱ्या कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात देणंही बंद केल्याचा आरोप मस्क यांनी केलाय.

वॉशिंग्टन : अॅपलनं (Apple) 'ट्विटर'ला आपल्या 'अॅप स्टोअर'मधून (App Store) काढून टाकण्याची धमकी दिलीय. मात्र, त्याचं कारण त्यांनी सांगितलं नाही, असं इलाॅन मस्क (Elon Musk) यांनी म्हटलंय. आयफोन बनवणाऱ्या कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात देणंही बंद केल्याचा आरोप मस्क यांनी केलाय.

'अॅपल ट्विटरवर दबाव आणतंय'

ट्विटर आणि टेस्लाचे अब्जाधीश सीईओ मस्क म्हणाले, 'अॅपल कंपनी नियंत्रणाच्या मागणीसाठी ट्विटरवर (Twitter) दबाव आणत आहे. Apple नं केलेली कारवाई असामान्य होणार नाही. कारण, कंपनी नियमितपणे त्यांचे नियम लागू करते. या अंतर्गत त्यांनी गॅब आणि पार्लर सारखे अॅप्स काढून टाकले आहेत. अॅपनं त्याची सामग्री आणि नियंत्रण पद्धती अपडेट केल्यानंतर 2021 मध्ये Apple नं पार्लर पुन्हा सुरू केलं.'

Apple vs Twitter
G-20 चं अध्यक्षपद ही भारतासाठी मोठी संधी; PM मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातील 10 मोठ्या गोष्टी

'अॅपलनं ट्विटरवरील जाहिराती थांबवल्या'

गेल्या महिन्यात 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतलेल्या मस्कनं एका ट्विटमध्ये म्हटलंय, "अॅपलनं बहुतेक ट्विटरवर जाहिराती थांबवल्या आहेत. ते अमेरिकेत भाषण स्वातंत्र्याचा तिरस्कार करतात का? असा सवाल त्यांनी केलाय. नंतर मस्कनं Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांच्या ट्विटर अकाऊंटला दुसर्‍या ट्विटमध्ये टॅग केलं आणि म्हटलं की, "इथं काय चाललं आहे?" मात्र, अॅपलनं या ट्विटला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()