Twitter चे मालक होताच Elon Musk ची मोठी कारवाई; CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे.
Tesla CEO Elon Musk
Tesla CEO Elon Muskesakal
Updated on
Summary

टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे.

टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना काढून टाकलं आहे.

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल (Ned Sehgal) आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेड सेहगल आणि पराग अग्रवाल हे दोघंही सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात उपस्थित होते, त्यावेळी त्यांना ट्विटरमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Tesla CEO Elon Musk
Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? मिस्टर अॅण्ड मिसेस वानखेडेंची 'ही' जाहिरात चर्चेत!

एलाॅन मस्क यांनी पराग अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल ट्विटर गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.

Tesla CEO Elon Musk
Trupti Desai : 'त्यांना' जाऊन 24 तासही होत नाहीत तोच..; तृप्ती देसाई राजकारण्यांना म्हणाल्या 'निर्लज्ज'

याआधी प्रसिद्ध उद्योगपती एलाॅन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हेडक्वार्टरमधून फिरतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. $44 अब्जमध्ये ट्विटर विकत घेण्याचा करार पूर्ण करण्यासाठी शुक्रवारच्या अंतिम मुदतीच्या दोन दिवस आधी त्यांनी बुधवारी व्हिडिओ शेअर केला. मस्कनं त्याचं ट्विटर प्रोफाइल देखील बदललं असून प्रोफाइलमध्ये बदल करुन त्यानं 'ट्विट चीफ' असं लिहिलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()