माथेफिरूने घेतला २४ मुलांचा जीव

थायलंडमधील पाळणाघरात गोळीबार; एकूण ३४ जणांचा मृत्यू
Thailand nursery shooting 34 people died
Thailand nursery shooting 34 people died
Updated on

बँकॉक : ईशान्य थायलंडमधील नॉन्गबुआ लंफू गावातील पाळणाघरात एका बंदुकधाऱ्या व्यक्तीने बेछूट गोळीबार केला. यात २४ मुलांसह ३५ जण मृत्युमुखी पडले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिस मेजर जनरल अच्छायोन क्रायथाँग यांनी दिली. गोळीबारानंतर हल्लेखोराने आत्महत्या केली.

गृह विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार गोळीबारात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात २३ मुले, दोन शिक्षक आणि एका पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नॉन्गबुआ लंफूमध्ये सैन्य सज्ज ठेवण्यात आले असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. हल्लेखोराने हल्ल्याच्यावेळी चाकूचाही वापर केला. ३४ जणांची हत्या केल्यानंतर संबंधित माथेफिरू पांढऱ्या पिकअपमधून तो गोळीबार करीत पळून गेला. तो ज्या गाडीने पळाला, त्याची नोंदणी बँकाॅकमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

घरी त्याने पत्नी व मुलांवर गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला आणि स्वतःची आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. ‘रॉयटर्स’च्या माहितीनुसार हल्लेखोर हा माजी पोलिस अधिकारी होता. काही दिवसांपूर्वीच त्याला सेवेतून कमी करण्यात आले होते. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

२०१९मधील गोळीबारातील मृतांची संख्या

  • ४ - थायलंड

  • ११ - अमेरिका

  • २३ - ब्राझील

दोन वर्षांपूर्वी झाली होती सामूहिक हत्या

थायलंडमध्ये परवानाधारक बंदुकांची संख्या अन्य देशांच्या तुलनेत जास्त आहे. पण अवैध शस्‍त्रांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. २०२०मध्ये नाखोन शहरातील मॉलमध्ये एका माथेफिरू सैनिकाने केलेल्या बेछूट गोळीबारात २९ जण ठार झाले होते. अमेरिका, ब्राझीलच्या तुलनेत बंदुकीचा वापर करून होणारे गुन्ह्यांचे प्रमाण थायलंडमध्ये कमी आहे, पण जपान, सिंगापूरपेक्षा जास्त आहे. गेल्या महिन्यात बँकॉकमधील थायलंड आर्मी वॉर कॉलेजमध्ये एका कारकुनाने सहकाऱ्यांवर केलेल्या गोळीबारात दोन जण ठार व एक जखमी झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.