Bhadresh Kumar Patel: गुजरातच्या तरुणाची अमेरिकन पोलिसांना हुलकावणी! माहिती देणाऱ्याला मिळणार 2 कोटींचे बक्षिस, काय आहे नेमकं प्रकरण

10 Most Wanted: पटेलला 2017 मध्ये वॉन्टेड लिस्टमध्ये टाकण्यात आले होते तेव्हा तो युनायटेड स्टेट्समध्ये होता आणि अल्टोमारे यांच्या मते, कोणीतरी जाणूनबुजून पटेलला मदत करत होते.
Bhadresh Kumar Patel|FBI 10 Most Wanted
Bhadresh Kumar Patel|FBI 10 Most WantedESakal
Updated on

FBI 10 Most Wanted:

FBI ने 12 एप्रिल 2015 रोजी अमेरिकेतील हॅनोवर, मेरीलँड येथे एका डोनटच्या दुकानात काम करत असताना आपल्या पत्नीला ठार मारल्याचा आरोप असलेल्या टेन मोस्ट वाँटेड फरारी भद्रेशकुमार चेतनभाई पटेल याची माहिती देणाऱ्याला 250,000 डॉलर्सच्या (2 कोटी 9 लाख रुपये) बक्षिसाची घोषणा केली आहे.

2015 मध्ये, पटेलने हॅनोवर, मेरीलँडमधील डंकिन डोनट्स कॉफी शॉपमध्ये चाकू भोकसून पत्नी पलकची हत्या केली होती, त्यानंतर तो फरार झाला होता.

तो एफबीआयच्या हाती लागत नसल्याने 2017 मध्ये त्याला वॉन्टेड लिस्टमध्ये टाकण्यात आले होते. FBI ने लोकांना या व्यक्तीचा ठावठिकाणा माहीत असल्यास एजन्सी किंवा जवळच्या यूएस कॉन्सुलेटशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

डब्ल्यूटीओपी रेडिओने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, "24 वर्षीय पटेलने दुकानाच्या मागील बाजूस स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्या 21 वर्षीय पत्नीवर अनेक वार केले."

Bhadresh Kumar Patel|FBI 10 Most Wanted
UN experts slam Pakistan: हिंदू-ख्रिश्चन महिलांचे सक्तीने विवाह अन् धर्मांतर; संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानला फटकारलं

टिम अल्टोमारे, जे त्यावेळी ॲन अरुंडेल काउंटीचे पोलिस प्रमुख होते, त्यांनी सांगितले होते की, “या प्रकरणामुळे परिसरात मोठा हिंसाचार झाला होता. हे हृदयद्रावक होते आणि पोलीस विभागासाठी हा धक्का होता."

WTOP ने अहवाल दिला की, तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की जेव्हा पटेलला 2017 मध्ये वॉन्टेड लिस्टमध्ये टाकण्यात आले होते तेव्हा तो युनायटेड स्टेट्समध्ये होता आणि अल्टोमारे यांच्या मते, कोणीतरी जाणूनबुजून पटेलला मदत करत होते.

Bhadresh Kumar Patel|FBI 10 Most Wanted
Paksitan: पाकिस्तानात रमजानच्या महिन्यात का झाली 19 जणांची हत्या? समोर आला भयंकर प्रकार

अमेरिकन तपास संस्था एफबीआय गेल्या आठ वर्षांपासून अहमदाबादच्या विरमगाम येथील भारतीय नागरिक भद्रेश कुमार पटेल याचा शोध घेत आहे.

FBI ने दहा मोस्ट वाँटेड फरारींपैकी एक असलेल्या भद्रेश कुमार याला अटक करणाऱ्यासाठी इतक्या मोठ्या रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. गुजरातमधील रहिवासी असलेल्या भद्रेशकुमारचा 2017 पासून एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.