US Aid To Israel: अमेरिकेचे शस्त्रास्त्रांनी भरलेले पहिले लढाऊ विमान इस्त्राइलमध्ये पोहोचले; संघर्ष आणखी तीव्र होणार

इस्त्राइलचे पंतप्रधान बेंज्यामीन नेतन्याहू यांनी युद्धाच्या स्थितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना माहिती दिली आहे.
Hamas Palestine conflict war update
Hamas Palestine conflict war update
Updated on

तेल अवीव- शस्त्रास्त्र असलेले अमेरिकेचे पहिले लढाऊ विमान इस्त्राइलमध्ये उतरले आहे, अशी माहिती इस्त्राइल डिफेन्स फोर्सने IDF दिली आहे. आयडीएफने 'एक्स' वर दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रास्त्र असलेले अमेरिकेचे पहिले विमान दक्षिण इस्त्राइलच्या नेवाटीम हवाईअड्ड्यावर मंगळवारी संध्याकाळी उतरले आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (The first plane carrying US armaments landed in southern Israel on Tuesday)

तंत्रज्ञान युक्त शस्त्रे

नेमकी कशाप्रकारची ही शस्त्रे आहेत याबाबत आयडीएफने खुलासा केलेला नाही. यात उच्च तंत्रज्ञान युक्त शस्त्रे असल्याचा दावा केला जातोय. हमासने इस्त्राइलवर हल्ला केला. त्यानंतर इस्त्राइलने प्रतिहल्ला सुरु केला आहे. इस्त्राइलने हा प्रतिकार अत्यंत कठोर असेल असं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यात अमेरिकेने इस्त्राइलला शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जो बायडेन सरकार इस्त्राइलला सर्वोतपरी मदत करत आहे.

Hamas Palestine conflict war update
Israel War : इस्राइलने परत मिळवला गाझा बॉर्डरवरील भाग; युद्धात आतापर्यंत 3,000 हून अधिक बळी

हमास ही ISIS पेक्षा वाईट

इस्त्राइलचे पंतप्रधान बेंज्यामीन नेतन्याहू यांनी युद्धाच्या स्थितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना माहिती दिली आहे. हमास ही ISIS पेक्षा वाईट आहे. त्यामुळे त्यांचा बिमोड करणे आणि त्यांना त्याच पद्धतीची वागणूक देणे आवश्यक असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी 'एक्स' या सोशल मीडिया हँडलवर झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली आहे.

जो बायडेन यांनी सर्व परिस्थितीतील लढ्यासाठी इस्त्राइलसोबत असल्याची ग्वाही नेतान्याहू यांना दिली आहे.त्यांना स्वत:चे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असंही ते म्हणाले. बायडेन यांच्या सूर्य प्रकाशाइतक्या स्वच्छ समर्थनानंतर नेतान्याहू यांनी त्यांचे आभार मानले आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारात हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्राइलवर अनपेक्षित हल्ला केला. त्यामुळे इस्त्राइलची तारांबळ उडाली होती.

Hamas Palestine conflict war update
इस्राईलकडून ‘अग्निवर्षाव’ युद्धातील मृतांची संख्या १२०० वर : ‘हमास’ला हुसकाविण्यासाठी प्रयत्न सुरू

अशी क्रूरता कधी नाही पाहिली

नेतान्याहू यांनी बायडेन यांना माहिती देताना सांगितलं की, हल्ल्याला आता चार दिवस झाले आहेत. यात हजारपेक्षा अधिक लोकांना मृत्यू झाला आहे, तर २८०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यांनी लहान मुलांना जिवंत जाळले, सैनिकांची मुंडके छाटले. फेस्टिवल साजरे करणाऱ्या तरुणांच्या कत्तली केल्या. अशाप्रकारची क्रूरता आम्ही इतिहासात कधीही पाहिली नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.