India-Canada: जस्टिन ट्रुडो भारतात हसण्याचा विषय; सत्तेत आलो तर संबंध सुधारेन- कॅनडातील विरोधी पक्षनेता

India-Canada
India-Canada
Updated on

ओटावा- भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर आता त्यांच्या देशातूनच टीका होताना दिसत आहे. पुराणमतवादी पक्षाचे नेते पायरे पोईलीवरे (Pierre Poilievre) यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतासोबत राजनैतिक संबंध हाताळताना कमी पडल्याचं म्हणत त्यांनी ट्रुडो यांनी खिल्ली उडवली. ( The leader of the Conservative Party of Canada slammed Canadian Prime Minister Justin Trudeau over his handling of diplomatic relations with India)

ट्रुडो हे भारतामध्ये हसण्याचा विषय ठरले आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये ते हसण्याचा विषय झालेत, असं पायरे म्हणाले आहेत. कॅनडाने भारतातून ४१ राजदूतांना परत बोलावण्याचा निर्णय घेतलाय. यावर बोलताना पायरे म्हणाले की, 'ट्रुडो हे अकार्यक्षम असल्याने अशी वेळ आली आहे. आता जगातील सर्व मोठ्या देशांसोबत कॅनडाचे वाद निर्माण झालेत.'

India-Canada
Canada: 'कॅनडा खलिस्तानी चळवळ विसरलाय'; ट्रुडोंच्या पक्षातील हिंदू खासदाराचे सरकारवर ताशेरे, सांगितल्या 3 घटना

भारत आणि कॅनडामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर भारत सरकारने कॅनडाला त्यांचे राजदूत कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कॅनडाने भारतातून ४१ राजदूत कमी केले आहेत. आता कॅनडाचे २१ राजदूत भारतात आहेत. भारताने राजदूत आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संरक्षण काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॅनडाने टीका केली होती. वियन्ना कराराचे हे उल्लंघन असल्याचं ट्रुडो म्हणाले होते.

भारताने ट्रुडो यांचे आरोप फेटाळले आहेत. वियन्ना कराराचे उल्लंघन झालेले नाही. भारत आणि कॅनडातील राजदूतांची संख्या समान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. या प्रकरणावर पायरे म्हणाले की, 'भारतासोबस संबंध सुधारणे आवश्यक आहे. त्यामुळे मी पंतप्रधान झालो तर भारतासोबत पुन्हा संबंध सुधारेन.'

India-Canada
India-Canada: आधी आग लावायची अन् पुन्हा विझवायला यायचं; भारत-कॅनडा वादात अमेरिकेची मध्यस्थी?

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. दोन्ही देशामध्ये काही विषयांमध्ये मतभेद आहेत. पण, आपण प्रोफेशनल संबंध कायम ठेवले पाहिजेत, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे ट्रुडो यांच्यासोबतचे वागणे चांगले नाही, असंही ते म्हणाले. कॅनडामध्ये हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. आपण याचा विरोध करतो असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com