अकोला: जगातिल अजब - गजब माहितीसाठी आपण नेहीमीच उत्सुक असतो. आपण बरेचदा सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमध्ये पाहिलं असेल की जगातून सर्वात मोठे शहर, सर्वात मोठी नदी, सर्वात मोठा खंड अश्या प्रकारची माहिती दिलेली असते. जे आपल्याला जगातील महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी मदत करते, त्याचप्रमाणे जगात वैशिष्ट्य पूर्ण गोष्टींना कायमचे जतन करण्यासाठी गिनीज बुक (Guinness Book) नोंदी ठेवत असते यामध्ये जगातील काही विशिष्ट आणि अलौकिक गोष्टींना जतन करण्यात येते, तर आज आपण असे व्यक्तिमत्व पाहणार आहोत ज्यांनी इतिहासात त्यांचे नाव रेकॉर्ड केलेले आहे.(The tallest man in history; To date, no one has been able to break his record)
आणि विशेष म्हणजे आजपर्यंत त्यांचे ते रेकॉर्ड कोणीही तोडू शकले नाही. ते कोण होते आणि त्यांनी कोणत्या गोष्टीत त्यांचे नाव जतन केले होते ते आज आपण पाहणार आहोत तर चला पाहूया.
आपण नेहमी पाहतो की जगातील लहान मोठे विश्व रेकॉर्ड हे नेहमी बदलत राहतात, परंतु काही असेही रेकॉर्ड असतात जे वर्षानुवर्षे बदलत नाहीत ते तसेच राहतात. आता पहा ना मागील ८० वर्षांपासून म्हणजेच १९४० पासून जगातील सर्वात उंच असण्याचे रेकॉर्ड एकाच व्यक्तीच्या नावावर आहे. आणि त्या व्यक्तीचे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकले नाही. आहे की नाही गंमत!
जगातून सर्वात उंच या ओळखीचे रॉबर्ट वॉड्लो ह्यांच्या नावावर हे विश्व रेकॉर्ड आहे. त्यांची उंची ही ८ फूट ११.१ इंच एवढी होती, आपण विचार करू शकता की ही व्यक्ती किती उंच असेल. आणि आजपर्यंत त्यांचे हे रेकॉर्ड जगातून कोणीही तोडू शकले नाही आहे. म्हणजेच त्यांच्या नंतर या पृथ्वीवर असा कोणताच मनुष्य जन्माला आलेला नाही जो त्यांच्यापेक्षा उंच असेल.
अमेरिकेच्या एल्टन मधील एलीनोइस या शहरात रॉबर्ट यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९१८ रोजी झाला. त्यांच्या आई वडिलांची उंची ही सामान्य होती, परंतु रॉबर्ट यांची उंची जन्माच्या नंतर काही दिवसांनी वाढतच गेली. सहा महिन्यात त्यांची उंची जवळजवळ तीन फूट झाली आणि सामान्य मुलांना हीच उंची व्ह्यायला दोन वर्षांची वेळ लागते.
केवळ एका वर्षाचे असताना त्यांची उंची ३ फूट ६ इंच एवढी होती, आणि जसे दोन वर्षाचे झाले त्यांची उंची ही ४ फूट ६ इंच एवढी झाली. पाच वर्षांचे असतांना ५ फूट ६ इंच एवढी त्यांची उंची झाली. जसजसे वय वाढत गेले तसतसे त्यांची उंचीही वाढतच गेली, १२ वर्षाचे असताना त्यांची उंची ७ फूट झाली. त्यावेळेस रॉबर्ट जगातील सर्वात उंच मुलांपैकी एक होते.
तेच नाही तर सण १९३६ मध्ये रॉबर्ट यांनी जगातील सर्वात उंच व्यक्तीचे रेकॉर्ड तोडले होते. तेव्हा त्यांची उंची ८ फूट ४ इंच होती. एवढंच नाही त्यांच्याविषयी आणखी एक गोष्ट ऐकून आपण अचंबित होणार, साधारण मनुष्य ८-९ किंवा १० नंबर चे बूट वापरतात, पण रॉबर्ट यांच्या साठी बूट बनविणाऱ्या कंपनीने स्पेशल बुटांचे निर्माण केले होते. आणि त्याची साईझ ही ३७AA एवढी होती.
पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात झाली की ती घातक होते तसेच रॉबर्ट यांच्या बाबतीत सुध्दा हेच झाले त्यांच्या एवढ्या जास्त उंची मुळे त्यांचे स्नायू आणि हाडे कमजोर झाली, आणि त्यामुळे त्यांना बाहेर फिरणे कठीण झाले. त्यांना काही दिवसानंतर सहारा घेऊन चालावे लागले. त्यांच्या शरीरात एक इन्फेक्शन झाले होते आणि या सर्व परिस्थिती मध्ये त्यांनी १५ जुलै १९४० मध्ये वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आपले प्राण सोडले. पण एक बाब अशी की त्या व्यक्तीचे रेकॉर्ड आजपर्यंतही ब्रेक केल्या गेले नाही. अजूनही रॉबर्ट यांच्याच नावावर जगातील सर्वात उंच मुनुष्याचे रेकॉर्ड आहे.
संपादन - विवेक मेतकर
(The tallest man in history; To date, no one has been able to break his record)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.