Israel War: इस्त्राइलची ताकद वाढवण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय; युद्धनौका आणि लढाऊ विमाने पाठवली!

Israel War
Israel War
Updated on

जेरुसलम- इस्त्राइल आणि पॅलेस्टिनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही गटांमध्ये तुंबळ संघर्ष सुरु आहे. इस्त्राइल-पॅलेस्टिन युद्धात अमेरिका इस्त्राइलच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली आहे. अमेरिकी सरकारने याआधीच इस्त्राइलला आर्थिक मदत जाहीर केली. बायडेन सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून युद्धनौका आणि लढाऊ विमाने इस्त्राइलच्या जवळच्या प्रदेशात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या मदतीमुळे इस्त्राइलचे बळ वाढणार आहे. संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धनौका इस्त्राइलच्या पूर्व मेडेटेरियन जवळ तैनात केली जाणार आहे. यावर लढाऊ विमाने असणार आहेत. तसेच मिसाईल डागता येणारी यंत्रणाही यावर आहे. याशिवाय अमेरिकेच्या एअरफोर्समधील F-35, F-15, F-16, आणि A-10 लढाऊ विमाने इस्त्राइल जवळच्या प्रदेशात तैनात करण्यात येणार आहे.

Israel War
Israel: तुमची मुलगी स्वर्गात जाईल; आई-वडिलांसमोरच हमास दहशतवाद्यांनी घेतले तिचे प्राण, व्हिडिओ

शनिवारी सकाळच्या सुमारास हमासच्या दहशतवादी गटाने इस्त्राइलवर हल्ला सुरु केला. अनेक रॉकेट इस्त्राइलवर डागण्यात आले. त्यानंतर इस्त्राइलने देखील प्रतिहल्ला केला. या संघर्षात दोन्ही बाजूचे ११०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. इस्त्राइलमध्ये तीन अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सीएनएननो दिली आहे. (The United States will send multiple military ships and aircraft closer to Israel as a show of support)

लॉयड ऑस्टिन यांच्या दाव्यानुसार इस्त्राइल आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध सुधारत होते. त्यामुळेच हमासने इस्त्राइलवर हल्ला केला. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राइलला पाठिंबा जाहीर केला आहे. ज्यो बायडेन यांनी इस्त्राइलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरु केला आहे. तसेच यात वाढ करण्यात येईल असं ते पंतप्रधान बेंज्यामिन नेतनाहू यांना म्हणाले आहेत.

Israel War
Israel-Hamas Conflict : आमच्यासाठी हे 9/11 सारखे; इस्त्राइल हमासवर हल्ले करणार आणखी तीव्र

काही पॅलिस्टिनी समर्थक न्यू यॉर्कच्या टाईम स्क्वेअर आणि वाईट हाऊसजवळ जमा झाले होते. त्यांनी अमेरिकेने इस्त्राइलला दिलेल्या पाठिंब्याला विरोध दर्शवला होता. या आंदोलकांनी काही पोस्टर बाळगले होते. यावर लिहिण्यात आलं होतं की, प्रतिकार हा दहशतवाद असू शकत नाही. अमेरिकन सरकारकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.