दिलासादायक! कोरोनाचा वेग मंदावतोय; WHOची माहिती

Omicron: दक्षिण आफ्रिकेत कोरोना संक्रमित लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती परंतु गेल्या एका आठवड्यात त्यात 14 टक्क्यांनी घट झाली आहे.
Corona Virus
Corona Virusesakal
Updated on

कोरोनाच्या (Covid 19) तिसऱ्या लाटेनं जगभरातील अनेक लोक संक्रमित झाले आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनची (Omicron) अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ओमिक्रॉन डेल्टापेक्षा कमी धोकादायक असल्याचे मानले जात आहे, परंतु तो जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून एक चांगली बातमी समोर आली आहे. आफ्रिकेतील चौथी लाट हळूहळू कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.

6 आठवड्यांच्या वाढीनंतर, आफ्रिकेतील ओमिक्रॉनमुळे आलेली चौथी लाट आता कमी होऊ लागली आहे. 11 जानेवारीपर्यंत आफ्रिकेत 10.2 दशलक्ष कोविड-19 ची प्रकरणे नोंदवली गेली. दक्षिण आफ्रिका, जिथे साथीच्या आजाराने संक्रमित लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, तिथे गेल्या एका आठवड्यात संक्रमितांच्या संख्येत 14 टक्क्यांनी घट झाली आहे. (The World Health Organization says the fourth wave in Africa is slowly receding.)

Corona Virus
कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण; भारतीयांनी घेतले 156.76 कोटी डोस

दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. आता तेथे देखील साप्ताहिक संसर्गामध्ये 9% घट झाली. पूर्व आणि मध्य आफ्रिकन प्रदेशातही घट नोंदवली गेली आहे. उत्तर आणि पश्चिम आफ्रिकन प्रदेशात प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, उत्तर आफ्रिकेत गेल्या आठवड्यात 121% ची वाढ नोंदवली गेली आहे. हे लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने येथे अधिक लसीकरण कव्हरेजसाठी सांगितले आहे.

आफ्रिकेत डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ. मात्शिदिसो मोएती म्हणाले की, सुरुवातीची चिन्हे सूचित करतात की देशातील चौथी लाट वेगवान आणि लहान होती, परंतु अस्थिरतेची कमतरता नाही. आफ्रिकेत साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या उपाययोजनांची नितांत गरज आहे, ती अजूनही सुरू आहे, परंतु त्यासाठी इथल्या लोकांना लवकरात लवकर कोरोनाची लस मिळणेही आवश्यक आहे.

Corona Virus
Children's Vaccination : CoWIN वर रजिस्ट्रेशन कसे करावे? जाणून घ्या

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी देखील अलीकडेच चिंता व्यक्त केली की आफ्रिकेच्या 85% पेक्षा जास्त लोकसंख्येला, किंवा सुमारे एक अब्ज लोकांना अद्याप लसीचा एकही डोस मिळालेला नाही. संपूर्ण खंडातील लोकसंख्येपैकी केवळ 10% लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे. आफ्रिकेतील डब्ल्यूएचओच्या लस-प्रतिबंधात्मक रोग कार्यक्रमाचे प्रमुख, अॅलेन पॉय यांनी सांगितले होते की, कोविड-19 चं लसीकरण करणाऱ्या आफ्रिकन लोकांची संख्या आठवड्यात 34 दशलक्षांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, जी सध्या 6 दशलक्षांपेक्षा कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()