रशियाच्या तेलावरील बंदीबाबत मतैक्य नाही, हंगेरीचा विरोध कायम

हंगेरीचा विरोध कायम; इतर पर्यायांचा ‘ईयू’कडून विचार सुरु
Crude Oil
Crude OilSakal
Updated on

ब्रुसेल्स - युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला आर्थिक अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या तेलावर आयातबंदी घालण्याचा युरोपीय समुदायाचा प्रयत्न असला तरी आज झालेल्या बैठकीमध्ये त्याबाबत एकमत होऊ शकले नाही. अशा प्रकारच्या आयातबंदीला हंगेरीचा जोरदार विरोध आहे.

रशियाच्या तेलावर पूर्ण बंदी घालण्याबाबत चर्चा करण्यासाठी युरोपीय समुदायातील राजदूतांची आज ब्रुसेल्स येथे बैठक झाली. याद्वारे रशियावर निर्बंधांचा सहावा टप्पा जारी करण्याचाही ‘ईयू’चा प्रयत्न होता. मात्र, हंगेरीने रशियाकडून तेल आयात बंद करण्यास नकार दिला. इतर काहीही पर्याय नसताना रशियाकडून तेलाची आयात बंद करणे म्हणजे अर्थव्यवस्थेवर अणुबाँब टाकल्यासारखेच आहे, अशी प्रतिक्रिया हंगेरीने दिली. आयातबंदी शक्य नसल्यास अन्य पर्यायांचाही विचार करण्यात आला. रशियातून समुद्रमार्गे आलेल्या इंधनावर निर्बंध घालावेत आणि नंतर जमिनीखालील पाइपलाइनद्वारे आलेल्या इंधनावर बंदी घालावी, या पर्यायावर चर्चा सुरु आहे.

लुहान्स्कसाठी तीव्र संघर्ष

युक्रेनच्या पूर्व भागातील सेव्हेरोदोनेत्स्क या शहराचा ताबा मिळविण्यासाठी रशियाचे जोरदार प्रयत्न सुरु असून युक्रेनी सैनिकांकडून त्यांना तीव्र प्रतिकार होत आहे. या शहराला रशियाच्या सैनिकांनी वेढा घातला असून ते हळूहळू पुढे सरकत आहेत. हे शहर ताब्यात येताच संपूर्ण लुहान्स्क प्रदेश रशियाच्या नियंत्रणाखाली येणार आहे. लुहान्स्क आणि दोन्तेस्क या दोन प्रदेशांनी मिळून बनलेला दोन्बास या भागावर ताबा मिळविणे हे रशियाचे सध्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()