रेल्वे रूळांवर पडले होते Amazon, FedEx चे पार्सल; चोरट्यांनी मारला डल्ला पाहा व्हिडिओ

मालवाहू कंटेनर्समधून वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे अधिकारी वैतागले आहेत
Train
Train
Updated on

अमेरिकेत Amazon आणि इतर कुरिअर पॅकेजेसच्या चोरीच्या घटना सध्या चिंतेचे कारण बनल्या असून, पार्सल ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशद्वारातून गायब होण्याच्या घटना घडत असताना, आता हेच पार्सल वाटेतच चोरी असल्याने अधिकाऱ्यांचा ताप वाढला आहे. दरम्यान, मालवाहू कंटेनर्समधून (Amazon & Other Courier Packages) वाढणाऱ्या चोरीच्या घटनांबद्दल ऐकल्यानंतर CBS फोटोग्राफर जॉन श्रेबरने याने लॉस एंजेलिसमधील लिंकन हाइट्स एरियाला भेट दिली. दरम्यान, अशा घटनांमुळे अमेझॉन आणि इतर मेल सेवा देणाऱ्या कंपन्या ऑर्डर केलेल्या पॅकेज सुरक्षित वितरण कशा पद्धतीने सुनिश्चित करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Amazon Parcel)

लिंकन हाइट्स हा एक मध्य LA मधील एक दाट लोकवस्तीचा परिसर असून, ट्रेन ट्रॅक युनियन पॅसिफिक (UP) टर्मिनल तसेच युनायटेड स्टेट्स सर्व्हिसेस (UPS) केंद्रावर एकत्रित येतात, जेथे गाड्यांमधील माल उतरवला जातो. (Courier Packages Theft) दरम्यान, जॉन याने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ (Theft Video On Tweeter ) आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले असून ट्रॅकवर (Railway Track) ठेवलेल्या पाच कंटेनरपैकी एका कंटेनरचे दरवाजे उघडलेले किंवा त्याचे कुलूप तोडलेले होते, असे श्रेबरने म्हटले आहे.

श्रेबरने पुढे म्हणतो की, नजर जाईल तिथपर्यंत फोडलेले बॉक्सेस नजरेस पडतात. यामध्ये य़ूएसमधील Amazon, Target, UPS आणि FedEx सारख्या अनेक प्रमुख कुरिअर कंपन्यांचे पॅकेजेस सापडल्याचे म्हटले आहे. चोरटे लांब मालवाहू गाड्यांचा वेग कमी होईपर्यंत थांबतात आणि नंतर मालवाहू कंटेनरवर चढून त्यांचे कुलूप आणि बोल्ट कटरच्या मदतीने सहजपणे तोडून बोगीमधील मौल्यवान वस्तू काढून घेतात. असे करताना चोरटे त्या वस्तूंना हात लावत नाही ज्या पुन्हा विकणे कठीण असते.

Train
पुण्यात MPSC उमेदवाराची आत्महत्या

या सर्व प्रकरणानंतर अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून अनेक उपायोजना मजबूत केल्या जात आहेत. तसेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि इतर प्रणालींचा वापर केला जात आहे, असे यूनियन पॅसेफिकने या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. या सर्व घटनांनंतर LA पोलीस आणि सुरक्षा एजट्सनी निर्बंध वाढवले असून 2021 च्या शेवटच्या तीन महिन्यांत 100 हून अधिक लोकांना युनियन पॅसिफिक गाड्यांमध्ये चोरी केल्या प्रकरणी अटक केली आहे. मात्र, पोलिसांकडून गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याच्यावरील आरोप कमी करून किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाख केला जातो. तसेच नाममात्र दंडाची रक्कम भरून 24 तासापेक्षा कमी कालावधित त्यांना सोडले जात असल्याचे एका रेल्वे ऑपरेटरने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.