जगभरात अशा अनेक घटना घडतात ज्याचे कारण कोणालाच माहीत नाही. निसर्गाचे चमत्कार पाहून तर शास्त्रज्ञही अवाक होतात. या गोष्टी का घडतात याचे कोडे उलगडलेले नाही. असाच आश्चर्यचकीत करणारा चमत्कार एका गावात घडतो. पण, या चमत्कारामूळे त्या गावातील लोकांना मात्र त्रास होत आहे.
जगभरातील अचंबित करणाऱ्या घटनांचे उत्तर कोणत्याही विज्ञानाच्या पुस्तकात सापडत नाही. अशीच एक घटना व्हिएतनाममधून समोर आली आहे. व्हिएतनाममधील एका गावात एवढी वीज पडली आहे की, तेथील लोक घाबरून पळू लागले आहेत. एका इंग्रजी वृत्तानुसार, व्हिएतनामच्या सोनताय जिल्ह्यातील लॉन्गव्होट गावात राहणारे ‘का डोंग’ समुदायाचे लोक घाबरले आहेत. या गावात वारंवार वीज पडते आणि त्याच्या सहवासातच लोकांचे आयुष्य घालवले जाते. गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की, आपल्या गावातच एवढी वीज का पडते?
व्हिएतनाम न्यूजनुसार, या गावावर वर्षाभरात अनेक वेळा वीज पडते. हे गाव घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले आहे. सतत वीज पडल्याने अनेक पाळीव जनावरे मरण पावली आहेत. तसेच, वीज पडल्याने झाडांनाही आग लागते. एवढेच नाही तर वीज पडूनही लोकांचे हाल होतात.
वारंवार कोसळणाऱ्या विजेमुळे लोकांचे शारीरिक आरोग्य तर बिघडत आहेच. पण लोकांचे मानसिक आरोग्यही बिघडत आहे. लहान मुले असो वा मोठी प्रत्येकजण विजेच्या आवाजाने घाबरतो. विजेचा आवाज ऐकून मोठी माणसेही घराच्या कोपऱ्यात लपून बसतात. ते जीव मुठीत धरून राहतात. कधी वीज पडेल आणि कधी त्यांची शेवटची रात्र असेल याचा विचार करतता. तर काही लोक जीवाच्या भितीने गाव सोडून गेले आहेत.
डोंगराळ भागात उंचावर वसलेल्या या गावावर वीज पडते. लांब व्होट हे गाव कोणत्याही डोंगरावर वसलेले नसूनही वर्षभर विजा आणि वादळे असतात. हे असे का घडते याचे खरे कारण शास्त्रज्ञांनाही अद्याप सापडलेले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.