Tilapia Fish: मासा खाल्ल्याने महिलेला कापावे लागले दोन्ही हात-पाय! घटनेमुळे खळबळ

Tilapia Fish
Tilapia Fish
Updated on

वॉशिंग्टन- अमेरिकेमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मासा खाल्ल्याने महिलेला तिचे दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले आहेत. कॅलिफॉर्नियातील ही घटना असून एक ४० वर्षीय महिलेने दूषित तिलापिया मासा खाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. त्यानंतर तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे दोन्ही हात आणि पाय कापावे लागले आहेत.

लॉरा बाराजस यांनी दूषित तिलापिया मासा खाल्ला होता. माहितीनुसार, मासा विब्रियो वुल्निफिकस या जिवाणूने दुषित होता. त्यानंतर लॉराने तो मासा खाल्ला होता. महिलेच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, जीवाणू संक्रमणमुळे लॉराची ही स्थिती झाली आहे. दाव्यानुसार, महिलेने अर्धा शिजलेला तिलापिया मासा खाल्ला आहे. त्यामुळे जिवाणूचा तिच्यात प्रवेश झाला.

Tilapia Fish
Chris Evans Wedding: कसलाही गाजावाजा न करता कॅप्टन अमेरिका फेम ख्रिस इव्हान्स अडकला लग्नबंधनात

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ४० वर्षीय लॉराला एका महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी तिचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन केलं नसतं तर महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. महिलेचे हात आणि पाय कापून तिचा जीव वाचवण्यात आला आहे.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेने एका धोकादायक जिवाणूच्या संक्रमणाबाबत इशारा जारी केला आहे. कच्चा किंवा अर्धवट शिजवलेला मासा खाल्यामुळे या जिवाणूचे संक्रमण होते. त्यामुळे महिलेला याच जिवाणूची लागण झाल्याचे बोलले जाते. महिलेचा जवळपास जीव गेलाच होता. महिला कोमामध्ये गेली होती, तसेच तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.

मित्राने दिलेल्या माहितीनुसार, महिलेची किडनी निष्क्रिय झाली होती. तिचे पाय, हात आणि ओठ काळे पडले होते. महिलेने स्थानिक बाजारातून मासा खरेदी केला होता. त्यानंतर घरी आणून तो शिजवला होता. जिवघेणा जिवाणू समुद्री जीव आणि समुद्राच्या पाण्यामध्ये आढळून येतो.

Tilapia Fish
ISS : अमेरिका आणि रशियाचे अंतराळवीर पोहोचले स्पेस स्टेशनला; एक वर्षाचं असणार मिशन

तुम्हीही मासा खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या. मासा खाल्याने आपल्याला ओमेगा-३, फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन डी मिळत असते. त्यामुळे लोक मासा खाण्यास पसंती देतात. पण, कच्चा मासा खाल्याने त्याचे नुकसान सहन करावे लागू शकतात. त्यामुळे सर्वांनी अन्न पदार्थ शिजवताना खबरदारी घ्यायला हवी. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.