Elon Musk : एलॉन मस्क ठरले टाइम 'पर्सन ऑफ द इयर'

"सध्या पृथ्वीवर आणि पृथ्वीबाहेर इतकी प्रभावशाली व्यक्ती कोणीही नाही"
Elon Musk
Elon Musk
Updated on

नवी दिल्ली : 'टेस्ला' आणि 'स्पेसेक्स'चे प्रमुख एलॉन मस्क हे टाइम मॅगझिनचे 'पर्सन ऑफ द इयर' ठरले आहेत. या मासिकानं गौरवलेली व्यक्ती म्हणजे जगभरात प्रभावशाली व्यक्ती असल्याचं मानलं जातं. टाइम मासिकाचे एडिटर इन चीफ एडवर्ड फेलसेंथल यांनी मस्क यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याबाबत गौरवास्पद भाष्य केलं आहे.

फेलसेंथल म्हणाले, "सन २०२१ मध्ये मस्क हे केवळ जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकचं नव्हे तर समाजात आलेल्या एका मोठ्या बदलाचे ते प्रेरक ठरले आहेत. सध्या पृथ्वीवर आणि पृथ्वीबाहेर काही प्रभावशाली लोक असतील पण त्यांच्यापेक्षा मस्क यांचा प्रभाव जास्त आहे"

Elon Musk
TMC म्हणजे टेम्पल-मॉस्क-चर्च; ममतांची गोव्यासाठी नवी रणनीती

टाइम मासिकाकडून सन १९२७ पासून 'मॅन ऑफ द इयर'चा किताब दिला जातो. यानंतर प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग पाहता मासिकानं या किताबाचं नाव बदलून 'पर्सन ऑफ द इयर' असं केलं. सन २०२० मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅऱिस यांना संयुक्तपणे 'टाइम पर्सन ऑफ द इयर' निवडलं गेलं होतं.

Elon Musk
बूस्टर डोसच्या ट्रायल घ्या आणि डेटा द्या; SECची सीरमला सूचना

टाइम मासिकाकडून दरवर्षी दिला जाणारा हा किताब मस्क यांना देण्याच्या निर्णयावर टाइमच्या राजकीय बातमीदारानं सांगितलं की, "अमेरिकेमध्ये दरसाल वाढत असलेल्या एलॉन मस्क यांच्या वाढत्या प्रभावाकडे दुर्लक्ष करता येणं कठीण आहे. त्यांच्याजवळ एक रॉकेट कंपनी आहे, जिचं अवकाश क्षेत्रातील उद्योगावर पूर्ण प्रभुत्व आहे. त्यांच्याजवळ एक कार कंपनी आहे जिचं इलेक्ट्रिक वाहन व्यवसायावर प्रभुत्व आहे. एलॉन मस्क यांचे ट्विटरवर ६.५ कोटी फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.