Titanic II : तोच रुट, तिच डिझाइन अन् तोच महासागर, टायटॅनिक 2 कधी उतरणार समुद्रात?

ऑस्ट्रेलियाचे मायनिंग बिलेनियर क्लीव्ह पामर यांच्या ब्लू स्टार कंपनीने टायटॅनिकसारखं जहाज बनवलं.
Titanic II
Titanic IIesakal
Updated on

Titanic II Launch : टायटॅनिक जहाज... या विषयी आज असं कोणीच नसावं ज्याला या जहाजाविषयी आणि त्याच्या दुर्घटनेविषयी माहित नसेल. याशिवाय नुकत्याच झालेल्या टायटॅनिक सबमरीन अपघातामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

टायटॅनिक हे ब्रिटीश लायनर जहाज होतं, ज्याविषयी सांगितलं जात की, ते कधीच पाण्यात बुडणार नाही, पण ते पहिल्याचवेळी बुडालं. १५ जुलै १९१२ ला झालेल्या या घटनेच्या वेळी त्यात २२०० लोक होते. अपघातात १५०० लोकांचा मृत्यू झाला. ही आजवरची सर्वात मोठी समुद्रिय दूर्घटना समजली जाते.

Titanic II
Titanic IIesakal

याचे अवशेष आजवर समुद्राच्या तळाशीच आहेत. या घटनेला १११ वर्ष होऊनही कोणीही ते काढू शकलेले नाही. कारण ते समुद्रात खोल ४००० किलोमीटर आत आहे. अनेक प्रकारे प्रयत्न करूनही ते शक्य झालेले नाही. लोकांच्या याच्याशी निगडीत एवढ्या आठवणी आहेत की, आजही टायटॅनिक स्मरणात आहे.

त्यामुळेच एका कंपनीने याचा रेप्लिका बनवला आहे. जो आता समुद्रात उतरण्यास तयार आहे. हा जसेच्या तसे टायटॅनिकसारखे दिसते. ते बघून कोणीही म्हणणार नाही की, ही कॉपी आहे. सगळ्यांना असलीच वाटेल. पण यात जुन्या टायटॅनिकच्या चुका मात्र टाळल्या आहेत.

Titanic II
Titanic Submarine Missing: टायटन पाणबुडीमध्ये स्फोट घडवून आणणारा कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन म्हणजे काय?
Titanic II
Titanic IIesakal

लाँचिंग डेट

या रेप्लिका जहाजाला ऑस्टेलियाच्या माइनिंग बिलियनेयर क्लीव पामर यांच्या ब्लू स्टार लाइन कंपनीने बनवले आहे. त्यांनी याला टायटॅनिक २ असे नाव दिले आहे. डेली स्टारच्या एका बातमीनुसार क्लीव यांनी ३० एप्रिल २०१२ मध्ये टायटॅनिक २ बनवण्याची घोषणा केली होती.

हे एकदम पहिल्या जहाजासारखेच डिझाइन करण्यात आले आहे. शिवाय हे त्याच रुटवरून जाणार जिथे जूनं टायटॅनिक बुडालं होतं. २०१६ मध्ये कंपनीने याच्या लाँच संदर्भात घोषणा केली होती. पण तो प्लॅम पोस्टपोन करण्यात आला. मग २०१८ मध्ये लाँच करणार होते पण तेही झाले नाही.

मग परत २०२२ मध्ये लाँच करणार असल्याची घोषणा झाली होती. पण पैशांवरून झालेल्या काही वादांमुळे हे पुन्हा पुढे ढकलण्यात आलं होतं. वर्ल्ड प्रेसच्या रिपोर्टनुसार आता याच्या लाँचची नवी डेट अद्याप समजलेली नाही.

Titanic II
Titanic Tourist Submarine : 'प्रेतं तरंगल्याने लागला पत्ता...' टायटनने जागवल्या ७६ वर्ष जुन्या रामदास बोटीच्या आठवणी
Titanic II
Titanic IIesakal

जुन्या टायटेनिकला श्रद्धांजली

द मिरर च्या बातमीनुसार टायटेनिक २ ही पहिल्या टायटेनिकला श्रद्धांजली वाहण्यासाठी बनवण्यात आली आहे. कंपनीने पूर्ण प्रयत्न केला आहे की, या जहाजाचे इंटेरियरपण जून्या टायटेनिक सारखेच असावे.

बरेच लोक करत आहेत निंदा

काही लोक या जहाजाविषयी उत्सुक आहेत की, त्यांना यामुळे टायटेनिकचा फील घेता येईल. तर काही लोक मात्र यावर टिका करत आहेत. त्यांच म्हणणं आहे की, क्लीव पामर यांचा हा पब्लिसीटी स्टंट आहे. त्यांना हे जहाज लाँच व्हावं असं नाही वाटतं. शिवाय अमेरिकाच्या टायटेनिक इंटरनॅशनल सोसायटीचे प्रेसिडेंट चार्ल्स हास यांचं म्हणणं आहे की, हे जुन्या जखमांवरची खपली काढण्यासारखं आहे. जे खूप चुकीचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.