Titanic बुडण्यापूर्वी बाटलीत भरून समुद्रात फेकली होती 'ही' चिठ्ठी?
‘कधीही न बुडणारे जहाज’ अशी ज्या जहाजाची ख्याती होती त्या टायटॅनिक (titanic) जहाजाला पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली. १५ एप्रिल १९१२ मध्ये टायटॅनिक बुडालं. आज या घटनेला १०० पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, आजही हे जहाज एक रहस्य बनूनच राहिलं आहे. असं म्हटलं जातं ज्यादिवशी हे जहाज बुडालं त्यावेळी एका १२ वर्षीय मुलीने मृत्युपूर्वी एक पत्र (handwritten) लिहून ते बाटलीत भरलं होतं आणि ही बाटली तिने समुद्रात फेकली होती. या पत्रामागील खरं सत्यता सध्या संशोधक करत आहेत. (titanic passenger alleged old handwritten note discovered)
'डेलीमेल'नुसार, फ्रान्समधील मॅथिल्डे लेफ्वेवर (Mathilde Lefebvre) या १२ वर्षीय मुलीने समुद्रात पत्राची बाटली फेकली होती. मॅथिल्डे त्यावेळी आपल्या आईसोबत न्यूयॉर्कला वडील व भावांडांना भेटण्यासाठी निघाली होती. या पत्रात तिने त्यावेळी घडत असलेल्या काही घटनांची नोंद केली होती.
"मी ही बाटली अटलांटिक समुद्राच्या मध्यभागी फेकत आहे. आम्ही काही दिवसांमध्येच न्यूयॉर्कला पोहोचणार आहोत. जर ही बाटली कोणाला सापडली तर कृपया लीविनमधील आमच्या लेविब्रे कुटुंबाला सांगा", असा मजकूर मॅथिल्डेने फ्रेंच भाषेत लिहिलं होता.
मॅथिल्डेने समुद्रात फेकलेली ही बाटली २०१७ मध्ये ब्रन्सविकमध्ये सापडली. हे पत्र सध्या युनिव्हर्स ड्यू क्यूबेक द रिमोस्की येथे पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे हे पत्र टायटॅनिक बुडतेवेळी लिहिलं होतं की नाही यावर संशोधन सुरु आहे.
दरम्यान, ब्रिटनच्या साऊथ हॅप्टन येथून १० एप्रिल १९१२ मध्ये टायटॅनिक जहाज न्यूयॉर्कला जाण्यासाठी निघाले होते. इंग्लडमधला उच्चभ्रु वर्ग तसेच तिस-या वर्गातील गरीब जनता अशा हजारो लोकांना घेऊन हे जहाज न्यूयॉर्कला निघाले होते. मात्र, १४ एप्रिलला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागराच्या विशाल हिमनगावर हे जहाज आदळले. आणि १५ एप्रिलला अवघ्या २ तास ४० मिनिटांमध्ये हजारो प्रवाशांसह हे जहाज बुडालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.