निर्वासित अफगाणी महिलांचा तुरुंगात छळ; तालिबानी शासक पाकिस्तानवर नाराज

पाकिस्तान सरकारने या अफगाणी नागरिकांना जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याची तयारी केली
torture of refugee Afghan women in prisons taliban rulers are angry with Pakistan
torture of refugee Afghan women in prisons taliban rulers are angry with PakistanSakal
Updated on

इस्लामाबाद : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानातील तुरुंगात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या अफगाणी नागरिकांची संख्या वाढत असून सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांकडून त्यांच्यावर अत्याचार आणि छळ सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला. त्याचवेळी पाकिस्तान सरकारने या अफगाणी नागरिकांना जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याची तयारी केली आहे.

तुरुंगात अफगाणी महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर तालिबान सरकारने नाराज व्यक्त करत जबरदस्तीने देशाबाहेर काढण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, असे पाकिस्तानला आवाहन केले आहे.

एकीकडे पाकिस्तान मानवतेचा आव आणत असताना दुसरीकडे देशातील तुरुंग आणि कैद्यांकडून त्यांची पोलखोल करत आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ समोर आला असून त्यात तुरुंगात अफगाणी महिला आणि मुले ठासून भरलेली दिसतात.

तुरुंगातील महिला म्हणतात, की आम्हाला दिवसांऐवजी रात्रीचा काळ कठीण आहे, अशा शब्दांत कैफियत मांडत आहेत. याचाच अर्थ सुरक्षा दलाकडून महिलांशी गैरवर्तन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचवेळी पाकिस्तानने म्हटले, की या महिनाअखेरपर्यंत अफगाणिस्तानच्या सर्व निर्वासितांना देशाबाहेर काढले जाईल.

या भूमिकेवर तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने नाराजी व्यक्त केली. तुरुंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने पाकिस्तानला इशारा दिला असून अफगाणिस्तानच्या नागरिकांसमवेत अशा प्रकारचे गैरवर्तन निंदनीय आहे. अफगाणचे निर्वासित हळूहळू मायदेशी परततील, असे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानने संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे.

तुरुंगात खाण्यापिण्याची सुविधा नाही

पाकिस्तान सरकारच्या आदेशाच्या फायदा घेत पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा निष्पाप अफगाणी नागरिकांभोवती चौकशीचा फास आवळत आहेत. चौकशीच्या नावाखाली आणि घुसखोरी केल्याच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिक, तरुण, मुलांना तुरुंगात डांबले आहे. तसेच महिलांना देखील आणले जात आहे. त्यांना खाण्यापिण्याची कोणतीच सुविधा दिली जात नाही. आगामी काळात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.